सेलिब्रिटींमध्ये कोरोनाचा हाहाकार, शिल्पानंतर ‘ही’ अभिनेत्री आणि तिची आई कोरोनाच्या विळख्यात

सेलिब्रिटींमध्ये कोरोनाचा हाहाकार, शिल्पानंतर ‘ही’ अभिनेत्री आणि तिची आई कोरोनाच्या विळख्यात

कोरोना व्हायरसने पुन्हा हाहाकार माजवला आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींमध्ये देखील कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळक आहे. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिच्यानंतर अभिनेत्री निकिता दत्ता आणि तिच्या आईला देखील कोरोणाची लागण झाली आहे. खुद्द निकिताना सोशल मीडियावर पोस्ट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. सध्या निकिता घरात क्वारेंटाईन आहे. कोरोनाची हलकी लक्षणं अभिनेत्रीला जाणवत आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणते, ‘कोविडने मला आणि आईला हेलॉ म्हटलं आहे. आशा आहे की हा नको असलेला पाहुणा जास्त काळ राहणार नाही. या छोट्या क्वारंटाइन नंतर भेटूया. सर्वजण सुरक्षित रहा.’ असं म्हणत अभिनेत्रीने सर्वांना सुरक्षित राहण्याचा देखील सल्ला दिला आहे.

सांगायचं झालं तर, निकिता नुकताच ‘ज्वेल थीफ’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीचं मोठं स्वप्न पूर्ण झालं. यावर आनंद व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली होती, ‘सिद्धार्थ आनंदच्या दुनियेतील सर्वात मोठी भाग होणं फार मोठी गोष्ट आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

शिल्पा शिरोडकर हिला कोरोनाची लागण

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला देखील कोरोनाची लागण झाल्याच कळताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शिवाय अभिनेत्री मास्क घालण्याचा देखील सल्ला दिला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव आली आहे. तुम्ही सुरक्षित राहा आणि मास्क लावा…’ असं अभिनेत्रीने सर्वांना आवाहन केलं आहे.

मे महिन्यातील कोरोना रुग्णांची संख्या

मे महिन्यात मुंबईत आतापर्यंत 95 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले आहेत, तर जानेवारीपासून महाराष्ट्रात फक्त 106 रुग्ण आढळले आहेत. इन्फ्लूएंझासारखी लक्षणे (ILI) किंवा श्वसन आजार (SARI) असलेल्या सर्व रुग्णांची आता COVID-19 साठी चाचणी केली जात आहे.

भारतात, बहुतेक नवीन कोरोना संसर्गांमध्ये, रुग्णाची स्थिती फारशी गंभीर झालेली नाही. एवढंच नाहीतर, कोरोनामुळे कोणत्याही मृत्यूची किंवा कोणत्याही रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल केल्याची कोणतीही नोंद नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधुनिक भारतात पुरुषप्रधान विचारांना थारा नाही, पत्नीचे फुटेज मागणाऱ्या पतीला कोर्टाचा हिसका आधुनिक भारतात पुरुषप्रधान विचारांना थारा नाही, पत्नीचे फुटेज मागणाऱ्या पतीला कोर्टाचा हिसका
आधुनिक समाज जीवनातील पुरुषप्रधान कल्पनांबाबत दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने महत्वपूर्ण भूमिका घेतली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज मागणाऱ्या...
IPL 2025 – हैदराबादचा मोठा धमाका; RCB चा धुव्वा उडवत 42 धावांनी जिंकला सामना
Photo – उफ्फ!!! कान्स डेब्यू साठी आलियाने निवडला सिंपल लूक, चाहते झाले इम्प्रेस
SIT म्हणजे डोळ्यात धुळफेक, सोयिस्कररित्या तयार केलेली कमिटी… धुळे वसूली कांडावरून अनिल गोटेंची फडणवीसांवर टीका
कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, कर्जमाफीवरुन शेतकरी आक्रमक
Ratnagiri News – रत्नागिरीत पावसाची संततधार सुरुच, नाचणेत दरड कोसळली
आम्ही तुमच्या सोबत, न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; उद्धव ठाकरे यांनी वैष्णवीच्या वडिलांशी साधला संवाद