दीपिका पदुकोण अनप्रोफेशनल; दिग्दर्शकाकडे केल्या अशा मागण्या की, तिला चित्रपटातूनच काढून टाकलं

दीपिका पदुकोण अनप्रोफेशनल; दिग्दर्शकाकडे केल्या अशा मागण्या की, तिला चित्रपटातूनच काढून टाकलं

बॉलिवूड अभिनेत्री जी सर्वांच्याच मनावर राज्य करते ती म्हणजे दीपिका पदूकोन. पण या अभिनेत्रीने एका दिग्दर्शकाला नक्कीच नाराज केलं आहे. दीपिकाच्या वागण्यामुळे आणि तिच्या मागण्यांमुळे दिग्दर्शक इतका वैतागला की त्याने दीपिकाला थेट चित्रपटातूनच काढून टाकलं आहे.

हा चित्रपट म्हणजे ‘स्पिरिट’. ज्या चित्रपटाची क्रेझ रिलीज होण्यापूर्वीच खूप जास्त आहे. याची घोषणा झाल्यापासून चाहते खूप उत्सुक आहेत. तेलुगू सुपरस्टार प्रभासच्या आणि जेव्हा दीपिका पदुकोण या चित्रपटाचा भाग होणार असल्याची बातमी आली तेव्हा चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली. पण आता या चित्रपटाशी संबंधित अशी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे  दीपिका ‘स्पिरिट’ मधून बाहेर पडली आहे.

दीपिकाला ‘स्पिरिट’ मधून बाहेर काढण्याचं कारण काय?

अभिनेत्री दीपिका पदुकोणने प्रभासच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून बाहेर पडल्याचे वृत्त आहे. तिच्या हकालपट्टीचे कारण तिच्या वाढत्या मागण्या असल्याचे म्हटले जातं आहे. ज्यामुळे कंटाळून चित्रपटाच्या निर्मात्यांनी अभिनेत्रीविरुद्ध हे पाऊल उचलले. हे दिग्दर्शक म्हणजे संदीप रेड्डी वांगा. संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटासाठी दीपिकाने अशा अनेक मागण्या केल्या की त्या ऐकल्यानंतर निर्मात्यांनी तिचे वर्तन ‘अनप्रोफेशनल’ असल्याचं म्हटलं.

दीपिकाने दिग्दर्शकाकडे अशा कोणत्या मागण्या केल्या?

अनेक तेलुगू वेबसाइट्सच्या वृत्तांनुसार, दीपिकाने दिग्दर्शकाला चित्रपटासाठी 8 तास काम करण्याची मागणी केली होती. पण निर्मात्यांना अभिनेत्रीसाठी फक्त 6 तासांचे शूटिंग योग्य वाटत होतं. याशिवाय, तिची मागणी अशी होती की दीपिकाने या चित्रपटासाठी तब्बल 20 ते 30 कोटी मागितल्याचं म्हटलं एवढंच नाही तर फीससह, ती चित्रपटाच्या नफ्यातही वाटा मागत होती. अभिनेत्रीने निर्मात्यांसमोर तेलुगू भाषेत डबिंग न करण्याची अट ठेवली होती. दीपिकाच्या एवढ्या मागण्या ऐकून दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा देखील नाराज झाले. त्यानंतर त्यांनी दीपिकाला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.


वाढत्या मागण्यांमुळे दीपिका ‘स्पिरिट’मधून बाहेर

आता दीपिकाच्या बाहेर पडल्यानंतर, संदीप चित्रपटासाठी नवीन अभिनेत्री शोधत आहे. त्यांनी त्यांच्या ‘स्पिरिट’ मध्ये दीपिकाला कास्ट करण्यासाठी अनेक बदलही केले होते. एका वृत्तानुसार, संदीपने दीपिकासाठी ‘स्पिरिट’चे शूटिंग सुरू करण्यासाठीही बदल केले होते. अभिनेत्रीच्या गरोदरपणामुळे दिग्दर्शकाने चित्रपटाचे चित्रीकरण पुढेही ढकलले होते. मात्र आता तिच्या वाढत्या मागण्या पाहता दिग्दर्शकाने तिला चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेतला.

दीपिकाच्या ऐवजी कोणती अभिनेत्री?

आता, दीपिकाच्या ‘स्पिरिट’मधून बाहेर पडण्याच्या बातम्या किती खऱ्या आहेत, हे चित्रपटाचे निर्मातेच पुष्टी करू शकतील. ‘स्पिरिट’चे शूटिंग अद्याप सुरू झालेले नाही. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होईल असे म्हटले जाते. सध्या चित्रपटाचे प्रदर्शन 2026 मध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दीपिका जर आता या चित्रपटात नसेल मग कोणती अभिनेत्री असणार हे पाहणं महत्त्वाचं.

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधुनिक भारतात पुरुषप्रधान विचारांना थारा नाही, पत्नीचे फुटेज मागणाऱ्या पतीला कोर्टाचा हिसका आधुनिक भारतात पुरुषप्रधान विचारांना थारा नाही, पत्नीचे फुटेज मागणाऱ्या पतीला कोर्टाचा हिसका
आधुनिक समाज जीवनातील पुरुषप्रधान कल्पनांबाबत दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने महत्वपूर्ण भूमिका घेतली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज मागणाऱ्या...
IPL 2025 – हैदराबादचा मोठा धमाका; RCB चा धुव्वा उडवत 42 धावांनी जिंकला सामना
Photo – उफ्फ!!! कान्स डेब्यू साठी आलियाने निवडला सिंपल लूक, चाहते झाले इम्प्रेस
SIT म्हणजे डोळ्यात धुळफेक, सोयिस्कररित्या तयार केलेली कमिटी… धुळे वसूली कांडावरून अनिल गोटेंची फडणवीसांवर टीका
कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, कर्जमाफीवरुन शेतकरी आक्रमक
Ratnagiri News – रत्नागिरीत पावसाची संततधार सुरुच, नाचणेत दरड कोसळली
आम्ही तुमच्या सोबत, न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; उद्धव ठाकरे यांनी वैष्णवीच्या वडिलांशी साधला संवाद