Operation Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानवर 100 क्षेपणास्त्रे डागली, 4 लढाऊ विमाने पाडली, 3 वैमानिक ताब्यात

Operation Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानवर 100 क्षेपणास्त्रे डागली, 4 लढाऊ विमाने पाडली, 3 वैमानिक ताब्यात

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला लष्करी तणाव आता उघड युद्धात रूपांतरित होताना दिसत आहे. या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे चार लढाऊ विमान पाडण्यात हिंदुस्थानला यश आले आहे. तसेच तीन पाकिस्तानी वैमानिकांना जिवंत पकडण्यात आले. यापैकी एक वैमानिक JF-17 लढाऊ विमानाचा असल्याचे सांगितले जात आहे.

हिंदुस्थानने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत एकाच वेळी 100 क्षेपणास्त्रे डागली. केवळ इतकेच नाही तर, पाकिस्तानची चार लढाऊ विमानेही पाडली. हिंदुस्थानने पाकिस्तानच्या मुख्य शहरांनाही लक्ष करत लाहोर , कराची, इस्लामाबादवर हल्ले केले. लाहोर, कराची, रावळपिंडी या शहरातही हिंदुस्थानने पाकला चांगलेच नमवले.

गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी सीमावर्ती भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे लक्ष्य हिंदुस्थानचे लष्करी तळ होते. परंतु सैन्याने सतर्कता दाखवत पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडले. सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच रोखण्यात आले आणि पाडण्यात आले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर, हिंदुस्थाननेही या हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले.

लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाचे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुष्टी केली की अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज ही शहरे लक्ष्य यादीत होती. तथापि हिंदुस्थानच्या मजबूत हवाई क्षेपणास्त्रांनी सर्व धोके यशस्वीरित्या निष्प्रभ केले. विविध ठिकाणांहून सापडलेल्या ढिगाऱ्यांवरून हे सिद्ध झाले की ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाकिस्तानी हद्दीतून आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर; महारेराकडे आठ वर्षांत 50 हजारांहून अधिक प्रकल्प नोंदवले गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर; महारेराकडे आठ वर्षांत 50 हजारांहून अधिक प्रकल्प नोंदवले
महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी आठ वर्षात 50 हजारांचा पल्ला ओलांडला आहे. 50 हजार नोंदणीपृत प्रकल्पांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे...
आजपासून बेस्टचा प्रवास महागला, किमान भाडे 10 रुपये
राज्यात 60 हजार अनधिकृत स्कूल बसेस, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कांजूर कारशेडच्या कामाला 25 जूनपर्यंत ब्रेक, काम जैसे थे ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश
ठेकेदारांपुढे महायुती सरकारचे लोटांगण, वादग्रस्त ऍम्ब्युलन्स टेंडर सुमित, एसएसजी, बीव्हीजी कंपनीलाच
अखेर युद्धाचा भडका उडाला! हिंदुस्थानचा पाकिस्तानवर एअर स्ट्राइक; राजधानी इस्लामाबाद, लाहोरसह सात शहरांवर क्षेपणास्त्र डागली
जम्मू – कश्मीर, पंजाब, राजस्थानसह सात राज्यांमध्ये ब्लॅक आऊट, सायरन वाजले; पाकिस्तानचे हल्ले हिंदुस्थानने परतवले