Big Breaking Operation Sindoor- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किमी अंतरावर मोठा स्फोट
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून योग्य उत्तर दिले जात आहे. ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किलोमीटर अंतरावर स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यापूर्वी, प्रत्युत्तराच्या कारवाईत, हिंदुस्थानने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीसह अनेक क्षेपणास्त्रे नष्ट केली होती. भारतीय लष्कराने पाकिस्तानची हाय-टेक लढाऊ विमाने एफ-16 आणि जेएफ 17 पाडली आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List