India – Pakistan War: ऑपरेशन सिंदूरनंतर प्राजक्ता माळीची लक्षवेधी पोस्ट
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील . 'ऑपरेशन सिंदूर' राबवल्यानंतर भारतीय सैन्याला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक पोस्ट लिहिली आहे.
'ऑपरेशन सिंदूर' राबवल्यानंतर पाठिंबा देत प्राजक्ता हिने भगवद्गीतेतील एक श्लोक लिहिला आहे. 'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्ध र्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे' हा श्लोक प्राजक्ताने लिहिला आहे.
भगवद्गीतेतील या श्लोकाचा अर्थ सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि वाईट वृत्तीचा नाश करण्यासाठी, धर्माची तत्त्व पुन्हा स्थापित करण्यासाठी मी युगानुयुगे या पृथ्वीवर अवतरतो.. असा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List