घटस्फोटानंतर 4 वर्षांनी समांथा विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात,नात्याची कबुली? म्हणाली ,’नवीन सुरुवात…’
बॉलिवूड आणि साउथमधील अशी एक अभिनेत्री जी तिच्या चित्रपटांच्या आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत आहे. ही अभिनेत्री म्हणजे समांथा रूथ प्रभू. समांथा तिच्या घटस्फोटांच्यानंतर स्वत:त केलेल्या बदलामुळे आणि ज्यापद्धतीने तिने करिअरमध्ये मिळवलेलं यश आहे त्यामुळे कायम चर्चेत असते.
समांथा आता पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत
समांथा आता पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या एका पोस्टमुळे आणि फोटोमुळे. बऱ्याच काळापासून मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की समंथा रूथ प्रभू दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यासर्व चर्चांमध्ये समांथाने बुधवारी तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर करत एक पोस्टही केली ज्यामुळे ती खरंच प्रेमात आहे. अशा चर्चांना उधान आलं. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये समांथाने ‘नवीन सुरुवाती’चा इशाराही दिला आहे.
समांथाचा नवीन प्रवास हा राज निदिमोरूसोबत नक्कीच सुरु होणार पण….
तर खरंच असं आहे का? तर समांथाचा नवीन प्रवास हा राज निदिमोरूसोबत नक्कीच सुरु होणार आहे पण तो प्रेमाचा नाही तर व्यावसायिक. म्हणजे समांथा निर्माती म्हणून आता पुढे आली आहे. निर्माती म्हणून तिच्या पहिल्या चित्रपट ‘शुभम’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चाहत्यांचा उत्साह सतत वाढवत आहे. समांथा रुथच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बनलेला हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. तिने याचसंदर्भातील नुकतेच दिग्दर्शक राज निदिमोरूसोबतचे याच संदर्भातील काही फोटो शेअर केले. ज्यामुळे नेटिझन्स ते डेट करत असल्याचा संशय घेत आहेत.
‘हा एक लांब प्रवास होता, पण आम्ही इथे आहोत’
फोटो शेअर करताना समांथाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा एक लांब प्रवास होता, पण आम्ही इथे आहोत.’ नवीन सुरुवात. #शुभम ९ मे रोजी प्रदर्शित होईल. समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू यांना यापूर्वी पिकलबॉल टीम चेन्नई सुपर चॅम्प्समध्ये एकत्र पाहिले गेले होते, त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल अफवा पसरू लागल्या. मात्र, दोघांनीही आतापर्यंत यावर मौन बाळगले आहे.
राज निदिमोरू विवाहित
दरम्यान दिग्दर्शक राज निदिमोरूबद्दल बोलायचं झालं तर, तो विवाहित आहे आणि एका मुलीचा बाप देखील आहे. राज निदिमोरूबद्दल सांगायचे तर, दिग्दर्शकाने श्यामली डेसोबत लग्न केले आहे. श्यामली ही सहयोगी दिग्दर्शक आहे. तर समांथाचं पहिलं लग्न अभिनेता नागा चैतन्यशी झाले होते. 2017 मध्ये गोव्यात भव्य स्वरुपात त्यांनी लग्न केले. तथापि, लग्नाच्या चार वर्षांनंतर,2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यचे लग्न शोभिता धुलिपालाशी झाले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List