याच कारणामुळे विराटने राहुल वैद्यला केलं ब्लॉक; अनुष्कासोबतचा Video पाहून नेटकऱ्यांचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली आणि गायक राहुल वैद्य यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. विराटने राहुलला इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॉक केलंय. यावरूनच राहुलने त्याच्यावर निशाणा साधला होता. आता राहुल आणि अनुष्का शर्मा यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जे पहायला मिळतंय, त्यामुळेच विराटने राहुलला ब्लॉक केल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. काही दिवसांपूर्वी विराटच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅनपेजवरील फोटोला लाइक करण्यात आलं होतं. ही गोष्ट व्हायरल झाल्यानंतर विराटने इन्स्टाग्राम अल्गोरिदमची चूक सांगत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावरून राहुल वैद्यने विराटला खोचक टोला लगावला होता. यानंतर विराटच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं होतं.
आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये राहुल स्टेजवर परफॉर्म करताना दिसत असून त्याच्या बाजूला अनुष्का उभी असल्याचं पहायला मिळत आहे. राहुल तिच्यासाठी गाणं गातो आणि गुडघ्यावर बसून त्याचा हात पुढे करतो. अनुष्कासुद्धा तिचा हात राहुलच्या हातात देते, तेव्हा तो तिच्या हातावर किस करतो. हे पाहून कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षक खूप खुश होतात. परंतु याच व्हिडीओवर आता नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘विराटला याच गोष्टीचा राग आला असेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘कदाचित याच कारणामुळे त्याने राहुलला ब्लॉक केलं असेल’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
विराटकडून अवनीत कौरचा फोटो लाइक झाल्यानंतर राहुलने त्याची फिरकी घेतली होती. हे विराटच्या चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. त्यांनी राहुल आणि त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर राहुलनेही सोशल मीडियावर राग व्यक्त केला होता. ‘विराट कोहलीचे चाहते हे त्याच्यापेक्षाही मोठे जोकर्स आहेत आणि आता तुम्ही मला शिवीगाळ करताय. इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही माझी पत्नी, माझ्या बहिणीबद्दलही अपशब्द वापरत आहात. त्यांचं याच्याशी काहीच घेणंदेणं नाही. त्यामुळे मी बरोबर बोललो होतो. म्हणूनच विराट कोहलची चाहते जोकर्स आहेत. दोन कवडीचे जोकर्स’, असं त्याने लिहिलं होतं. या वादानंतर आता क्रिकेटर युजवेंद्र चहलनेही राहुलला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List