ट्यूमरच्या त्रासाने ग्रासली अभिनेत्री दीपिका, प्रकृती खालावली; पतीने दिली हेल्थ अपडेट
अभिनेत्री दीपिका कक्कड सध्या कठीण काळातून जात आहे. दीपिकाला ट्यूमर झाला आहे. दीपिकाची प्रकृती सध्या बिकट असून त्यावर तिचा पती आणि अभिनेते शोएब इब्राहिम यांनी माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या यकृतात टेनिसच्या चेंडूच्या आकाराचे ट्यूमर आहे. ट्यूमरच्या वेदनांदरम्यान तिला तापही आला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शोएब इब्राहिमने त्याच्या अलीकडील यूट्यूब व्लॉगमध्ये दीपिकाच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले की, तापामुळे दीपिकाची शस्त्रक्रिया लांबणीवर गेली आहे.
शोएबने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितले, “मी यापूर्वी अपडेट देऊ शकलो नाही कारण मी व्यस्त होतो. दीपिकाची शस्त्रक्रिया अजून बाकी आहे आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत. दीपिकाने मागील वेळी जेव्हा आम्ही रुग्णालयात गेलो होतो, तेव्हा काही चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर दीपिकाने रुहानचे दूध सोडवले आहे. आम्हाला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात जायचे होते. पण दीपिका आजारी पडली आणि तिला तीव्र ताप आला.”
वाचा: एका हंगामात IPL टीम किती पैसे कमावतात? BCCI कडूनच मिळतात 400 कोटी
शस्त्रक्रिया का झाली नाही, डॉक्टरांनी दिली ही तारीख
अभिनेत्याने पुढे सांगितले की, दीपिकाचा ताप 103 अंशांपेक्षा जास्त होता. याशिवाय तिला शरीरात खूप वेदना देखील होत होत्या. तिने अनेक औषधे घेतली, पण त्यावेळी कोणतीही औषधे परिणामकारक ठरली नाहीत. शोएब इब्राहिमने हेही सांगितले की, आता दीपिका बरी वाटत आहे. त्यामुळे डॉक्टर सोमवार, 26 मे रोजी तिच्या ट्यूमरची शस्त्रक्रिया करू शकतील.
त्याने पुढे सांगितले की, शेवटी डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचण्यांनंतर आम्हाला काय करायचे ते कळेल. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, तिच्या शरीरात एक ट्यूमर आहे ज्याला काढणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होऊ शकते, जेव्हा उरलेल्या चाचण्या देखील पूर्ण होतील. यासह, शोएबने सर्वांना दीपिकासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आणि सर्व काही ठीक होईल अशी आशा व्यक्त केली.
या महिन्याच्या सुरुवातीपासून दीपिका त्रस्त
नुकताच शोएब इब्राहिमने सांगितले होते की, या महिन्याच्या सुरुवातीपासून दीपिकाच्या पोटात दूखत होते. सुरुवातीला संसर्ग समजून तिला औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण, जेव्हा वेदना वाढल्या, तेव्हा अभिनेत्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने काही स्कॅन केले. त्यामध्ये यकृतात ट्यूमर असल्याचे निदान झाले. सीटी स्कॅनमधून समजले की, दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागात एक ट्यूमर आहे. हा ट्यूमर टेनिसच्या चेंडूच्या आकाराचा आहे. हे आमच्यासाठी खूप धक्कादायक होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List