Operation Sindoor अजून काहीतरी मोठं घडणार आहे? माजी लष्करप्रमुख मनोज नरावणे यांनी पोस्ट करत दिले संकेत

Operation Sindoor अजून काहीतरी मोठं घडणार आहे? माजी लष्करप्रमुख मनोज नरावणे यांनी पोस्ट करत दिले संकेत

हिंदुस्थानी हवाई दलाने बुधवारी पहाटे पाकिस्तानात घुसून तेथील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. हा एअर स्ट्राईक करत हिंदुस्थानने 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. संपूर्ण देशभरात हिंदुस्थानी जवानांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे. दरम्यान हिंदुस्थानचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी एक पोस्ट शेअर करत या हल्ल्यापेक्षाही काहीतरी मोठे घडणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या पोस्टवरून आता नेमके या घडणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर बुधवारी सकाळी मनोज नरावणे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी फक्त ‘अभी पिच्चर बाकी है’ इतकेच लिहले आहे. मात्र या चार शब्दांतून त्यांनी काहीतरी मोठे होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ऑपरेशन सिंदूर

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्थानी सैन्याने बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या 9 तळांवर हवाई हल्ले केले. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हे हल्ले बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने याबाबत X वर पोस्ट करत माहिती दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत आजही कोसळणार मुसळधार पाऊस, 4-5 दिवस कसं असेल वातावरण ? मुंबईत आजही कोसळणार मुसळधार पाऊस, 4-5 दिवस कसं असेल वातावरण ?
गेल्या दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावून मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवणारा पाऊस आजही मुंबईत आणि आसपसाच्या परिसरात कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत आजही...
याच कारणामुळे विराटने राहुल वैद्यला केलं ब्लॉक; अनुष्कासोबतचा Video पाहून नेटकऱ्यांचा अंदाज
तर मी लढाऊ विमानासह देशसेवेसाठी तयार आहे! Operation Sindoor नंतर तेज प्रताप यादव यांचे विधान चर्चेत
राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी कालमर्यादेची गरज नाही, केंद्रानं अलाहाबाद हायकोर्टात स्पष्ट केली भूमिका
Operation Sindoor चा 100 टक्के अचूक लक्ष्यभेद; मिसाईल हल्ल्यात JeM व LeT चे दहशतवादी तळ उद्ध्वस्त, सॅटेलाईट फोटो आले समोर
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पॅलेस्टिनी समर्थकांचा गोंधळ, 10-12 विद्यार्थ्यांना अटक
ममतांचा दौरा सुरू असताना मुर्शिदाबादमध्ये TMC च्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, गोळीबारात गंभीर जखमी