Pahalgam Terror Attack शेख सज्जाद गुल पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंटचा म्होरक्या शेख सज्जाद गुल हा 50 वर्षीय कश्मिरी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली आहे. लष्करी अधिकाऱयांनी याबाबतची माहिती दिली. लष्कर-ए-तोयबाच्या संरक्षणाखाली तो पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात लपला असून त्याला सज्जाद अहमद शेख म्हणूनही ओळखले जाते.
शेख सज्जाद हा अनेक दहशतवादी हल्ल्यांचा प्रमुख सूत्रधार आहे. 2020 ते 2024 दरम्यान मध्य आणि दक्षिण कश्मीरमध्ये झालेल्या हत्या, 2023 मध्ये मध्य कश्मीरमध्ये करण्यात आलेले ग्रेनेड हल्ला, अनंतनागच्या बिजबेहरा येथे जम्मू-कश्मीर पोलिसांवर केलेला हल्ला, गगनगीर, गंदरबल येथे जेड-मोड बोगद्यात कामगारांना केलेले हल्ले यात सज्जादच प्रमुख सुत्रधार असल्याची माहितीही मिळाल्याचे लष्करी अधिकाऱयांनी सांगितले. एप्रिल 2022 मध्ये त्याला दहशतवादी घोषित करून त्याच्यावर एनआयएने 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. त्याच्याच सांगण्यावरून पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List