Jyoti Malhotra : पाकची हेर ज्योती मल्होत्राची 4 वेळा मुंबईवारी, गर्दीच्या ठिकाणी जाऊन…
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली हरियाणाच्या हिसारमधील ज्योति मल्होत्रा हिला अटक करण्यात आली असून पंजाब पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. त्यातूनच रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत असून पोलीसही तिच्या कारनाम्यांमुळे हैराण झालेत. भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचाही आरोप ज्योतीवर आहे. याच ज्योतीबाबत आता आणखी एक नवी माहिती समोर आली आहे ती म्हणजे गेल्या 2 वर्षांत ज्योतीने तब्बल चार वेळा मुंबईवारी केल्याचे उघड झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळातही मुंबईत येऊन येथील गर्दीचे, विविध ठिकाणांचे फोटो, व्हिडीओ तिने काढल्याचे समोर आले आहे.
Jyoti Malhotra : 20 हजारांचा जॉब पण घर… ज्योती मल्होत्राने किती पैशांत विकलं ईमान ?
चार वेळा केला मुंबईचा दौरा, हेतू काय ?
यूट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्रा हिनी अखेर आयएसआयशी संबंधांची दिली कबुली दिली आहे. त्यातच आता नवी माहिती समोर आली आहे, 2023 आणि 2024 या वर्षात मिळून तिने मुंबईचा एकूण 4 वेळा दौरा केला. गर्दीच्या ठिकाणी तिचा वावर होता अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा या ठिकाणांनाही तिने भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लालबागच्या राजाचे, तिथेली गर्दीचे काही व्हिडीओ देखील तिने शूट केले होते. 2 वेळा ट्रेनने तर एकदा बसने ती मुंबईला आल्याची माहिती समोर येत आहे. ज्योतीने संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ काढलेत, असंही समोर आलंय. मुंबईची तिने रेकी केली होती का, त्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास आता यंत्रणा करत आहेत.
Jyoti Malhotra : ज्योती तर फक्त ट्रेलर… 3 दिवसात पकडले 11 पाकिस्तानी हेर; एकेकाची कुंडली वाचा?
ज्योती मल्होत्राने 2024 मध्ये तीन वेळा तर 2023 मध्ये एकदा मुंबईवारी केली. मुंबईत अनेक ठिकाणी तिच वास्तव्य होतं, बऱ्याच ठिकाणी ती फिरली होती. गणेशोत्सवाच्या काळाताही तिने एकदा मुंबईला भेट दिली होती. मुंबईत अनेक भागात फिरताना तिने फोटो, व्हिडीओ काढले. 2023 साली तिने लालबागचा राजा, तसेच गणेशगल्लीचा राजा येथे फिरून तिथली गर्दी, याचा व्हिडीओ काढला होता, त्याचे अनेक रेकॉर्ड हे तपास यंत्रणांना मिळाले आहेत. मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढले होते, मात्र नंतर तिने ते डिलीट केले. हे व्हिडीओ, फोटो तिने कोणाला पाठवले याचा तपास सुरू आहे. देशाबद्दलची संवेदनशील माहिती तिने दिल्याचे उघड होत असतानाचा आता ज्योतीची मुंबई लिंकही समोर येत आहे असून त्याबद्दलही चौकशी करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List