चॉकलेटपासून बनवा ‘हे’ पाच फेस मास्क उन्हाळ्यात त्वचेसाठी ठरतील फायदेशीर

चॉकलेटपासून बनवा ‘हे’ पाच फेस मास्क उन्हाळ्यात त्वचेसाठी ठरतील फायदेशीर

लहान मुले असोत किंवा मोठी माणसे सर्वांनाच चॉकलेट खायला आवडते. तसेच चॉकलेट आपल्या आरोग्यासाठीही खुप फायदेशीर आहे. त्याचबरोबर तुमचा मुड सुधारण्यासाठी तुम्ही चॉकलेटचे सेवन करू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का की चॉकलेट तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यास देखील मदत करू शकते? चॉकलेटपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार बनते. हे फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावरील सर्व घाण काढून टाकतात आणि त्वचा स्वच्छ आणि नितळ बनवतात. म्हणून पुढच्या वेळी चॉकलेट खाण्यासोबतच यापासून फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावायला विसरू नका.

पण तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील जसे की चॉकलेट तुमच्या त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे, तुमच्या चेहऱ्यावर लावणे सुरक्षित आहे का? तर या लेखात तुम्ही चॉकलेटला तुमच्या स्किन केअरचा एक भाग कसा बनवू शकता ते जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या त्वचेची चमक अबाधित राहील.

चॉकलेट त्वचेसाठी का फायदेशीर आहे?

डार्क चॉकलेटमध्ये कॅटेचिन, पॉलीफेनॉल, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्हनॉल असतात. तसेच यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स कोलेजन उत्पादनात देखील मदत करतात. जे तुम्हाला चमकदार त्वचा देते.

चॉकलेटपासून बनवा हे 5 फेस मास्क

डार्क चॉकलेट फेस मास्क

हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 डार्क चॉकलेट, 4-5 चमचे दूध, 3 चमचे ब्राऊन शुगर आणि 1 चमचा मीठ घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये दुध घेऊन त्यात चॉकलेट वितळवा आणि त्यात मीठ आणि साखर मिक्स करा. तयार फेसपॅक थंड झाल्यावर 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा मास्क तुमची त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यास मदत करतो.

चॉकलेट आणि केळीचा फेस मास्क

चॉकलेट आणि केळीचा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे कोको पावडर, 1 चमचा मध, अर्धा कप मॅश केलेले केळे आणि 1 चमचा दही घ्या. हे सर्व पदार्थ मिक्स करा. त्यानंतर त्याची पेस्ट बनवा आणि ती तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा मास्क अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे त्यामुळे तो तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करतो.

चॉकलेट आणि ओट्स फेसमास्क

हा फेस मास्क बनवण्यासाठी अर्धा कप कोको पावडर, 3 चमचे ओट्स, 1 चमचा क्रीम आणि मध घेऊन सर्व पदार्थ मिक्स करा. आता तयार फेसपॅक चेहऱ्यावर आणि मानेवर 20 मिनिटे लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा हा फेस मास्क वापरू शकता.

चॉकलेट आणि बेसनाचा मास्क

हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे बेसन, 1 चमचा दही, अर्धा कप कोको पावडर आणि अर्धा लिंबू घ्या. हे सर्व पदार्थ मिक्स करा आणि नंतर हा फेस मास्क चेहऱ्यावर 30 मिनिटे लावा आणि सुकल्यानंतर चेहरा धुवा. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करते.

चॉकलेट आणि हळदीच्या फेस मास्कने मिळवा चमकदार त्वचा

हा मास्क बनवण्यासाठी 2 चमचे कोको पावडर, 1 चमचा हळद पावडर आणि 2 चमचे दूध एकत्र करून चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा. यामुळे तुम्हाला निर्दोष आणि चमकदार त्वचा मिळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मोदीजी पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? तुमचं लक्ष..’, प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा हल्लाबोल ‘मोदीजी पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? तुमचं लक्ष..’, प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा हल्लाबोल
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला....
बॉलिवूड सेलिब्रिटींचे वॉर्डरोब्स पाहिले का; आलिया-करीनाचं लाखोंच्या किंमतीचे शूज अन् बॅग कलेक्श
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मुलीची हत्या, सेलिब्रिटीने भोगली जन्मठेपेची शिक्षा, हैराण करणारं प्रकरण
रात्री दही खाणे आरोग्यासाठी हानिकारक, जाणून घ्या कारण
onions benefits: फक्त भाजीची चवचं नाही तर आरोग्यासाठी संजीवनी ठरतो कांदा… जाणून घ्या फायदे
आंबा खाल्ल्याने शुगर वाढते का ? मधुमेह असलेल्या लोकांनी वाचायलाच हवे ‘हे’ स्पष्टीकरण
बडीशेपचे पाणी पिल्याने वजन कमी होण्यास खरोखर मदत होते का? वाचा सविस्तर