एक कप …‘बबल टी’चा! तरुणाईमध्ये चहाचा नवा ट्रेंड
चहा हिंदुस्थानींचे आवडते पेय. सकाळी-दुपारी चहा तर हवाच. जुनी लोक तर चहाचे चाहते आहेत. तरुणाईला चहा आवडू लागलाय, पण त्यांची टेस्ट वेगळी आहे. त्यांना ‘बबल टी’चे वेड लागलंय. एक नवा ट्रेंड यानिमित्ताने देशभर दिसत आहे.
‘बबल टी’ ही एक तैवानी रेसिपी आहे, जी चहामध्ये दूध, फळे आणि फळांच्या रसांचे मिश्रण करून बनवली जाते. त्यामध्ये चविष्ट टॅपिओका मोती घालून मिक्स केले जाते. गरम किंवा थंड अशा दोन्ही प्रकारांत ‘बबल टी’ असतो. कस्टम मार्केट इनसाइट्सनुसार, हिंदुस्थानातील ‘बबल टी’ मार्केट 2024 मध्ये 450 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून 2033 पर्यंत 930 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत दुप्पट होण्याचा अंदाज आहे. फिलीपिन्स, उत्तर अमेरिका आणि त्यापलीकडे आपली छाप सोडणारे हे विचित्र पेय आता हिंदुस्थानात पसरतंय. बोबा भाई, नोमी टी आणि हाराजुपू टोकियो कॅफेसारखे नवीन काळातील ब्रँड आघाडीवर आहेत.
नावीन्यपूर्ण बदल
1980 च्या दशकात तैवानमध्ये शालेय मुलांसाठी ‘बबल टी’ पहिल्यांदा बनवण्यात आला. आज ‘बबल टी’ जागतिक स्तरावरीय पेय ठरले आहे. हिंदुस्थानात मिलेनियल्स आणि जनरेशन झेडचे लक्ष ‘बबल टी’ने वेधून घेतलंय. आपल्या देशात गेल्या काही वर्षांत शहरी भागात कोरियन संस्कृती, संगीत, खाद्यपदार्थ आणि पेयांबद्दलची उत्सुकता वाढत असल्याचे आपल्याला दिसून आले आहे. तैवानमध्ये मूळ असलेला ‘बबल टी’ या ट्रेंडमध्ये अखंडपणे बसतो, असे बोबा भाईचे संस्थापक आणि सीईओ ध्रुव कोहली यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List