हिंदुस्थानशी पंगा, चीनशी यारी, बांगलादेशला भारी; 9367 कोटींचे नुकसान
चीनशी हातमिळवणी करत हिंदुस्थानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशला हिंदुस्थानशी पंगा घेणे आणि चीनशी यारी महागात पडली आहे. हिंदुस्थानच्या एका निर्णयामुळे बांगलादेशवा थेट 9367 कोटींचा फटका बसला आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने म्हटले आहे की भारतीय बंदरांवर बांगलादेशी वस्तूंना बंदी घातल्याने दरवर्षी $770 दशलक्ष (सुमारे 9,367 कोटी बांगलादेशी टाका) नुकसान होऊ शकते. त्यामुळे चीनशी यारी बांगलादेशला आणखी महागात पडण्याची शक्यता आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर, हिंदुस्थान आता पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशांना आणि हिंदुस्थानशी पंगा घेणाऱ्यांना धडा शिकवत आहे. चीनशी हातमिळवणी करत हिंदुस्थानच्या चिकन नेक परिसरावर कब्जा करण्याचे मनसुबे बांगलादेश आखत होता. चीनशी असलेल्या या यारीमुळे आता बांगलादेशही हिंदुस्थानच्या रडारवर आहे. मोहम्मद युनूस यांनी चीनशी हातमिळवणी करत हिंदुस्थानबाबत काही वादग्रस्त टिप्पण्या केल्या आणि आता त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
हिंदुस्थानने बांगलादेशच्या अनेक वस्तूंसाठी भारतीय बंदरे बंद केली आहेत. 17 मे रोजी बांगलादेशातून आयात केलेल्या अनेक वस्तूंवर या बंदरांवर बंदी घालण्यात आली आहे, ज्यात तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने यांचा समावेश आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बांगलादेशातून तयार कपड्यांची आयात आता फक्त दोन बंदरांपर्यंत मर्यादित राहील, न्हावा शेवा आणि कोलकाता बंदर, तर इतर सर्व बंदरांवरून आयात करण्यावर बंदी राहील. याचा अर्थ स्पष्ट आहे की आता बांगलादेशला जमिनीवरील बंदराऐवजी फक्त समुद्री बंदरातून निर्यात करता येईल.
सरकारने सर्व भू-बंदरांवर बांगलादेशी वस्तूंवर तात्काळ बंदी घातली आहे आणि त्यांना फक्त दोन सागरी बंदरांपर्यंत मर्यादित केले आहे. या कारवाईमुळे बांगलादेशचे किती नुकसान होणार आहे हे स्पष्ट करणारा अहवाल ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, भू-बंदरांमधून बांगलादेशी आयातीवर बंदी घालण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयामुळे बांगलादेशला सुमारे 9,367 कोटींचे नुकसान होणार आहे. हा आकडा एकूण द्विपक्षीय आयातीच्या सुमारे 42 टक्के आहे.
बांगलादेश आणि हिंदुस्थान यांच्यातील सुमारे 93 टक्के व्यापार केवळ भू-बंदरांद्वारे होत होता, परंतु आता ही भू-बंदरे बंदरे बंद झाल्यानंतर बांगलादेशी उत्पादने फक्त कोलकाता किंवा महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदरातूनच येऊ शकतील आणि त्याचा थेट परिणाम बांगलादेशी निर्यातीच्या खर्चात वाढ होण्याच्या स्वरूपात दिसून येईल, जो त्याच्यासाठी खूप हानिकारक ठरेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List