लग्न समारंभासाठी आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू, आंध्र प्रदेशमधली धक्कादायक घटना
लग्न समारंभात आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
आंध्र प्रदेशच्या गोदावरी पूर्व जिल्ह्यात एक लग्न समारंभ होता. या समारंभात चार मुलं आली होती. खेळता खेळता मुलं बाहेर गेली आणि एका बेवारस गाडीत जाऊन बसली. अचानक ही गाडी लॉक झाली. या गाडीत या मुलांना श्वास घेता येत नव्हता. त्यातच या मुलांचा गाडीतच गुदमरून मृत्यू झाला.
बराच वेळ झाला मुलं दिसली नाही म्हणून त्यांचे पालक हवालदिल झाले. त्यांचा शोध घेतल्यानंतर ही मुलं गाडीत सापडली. पण तेव्हा फार उशीर झाला होता. सर्व मुलं ही 6 ते 8 वर्षांची होती. त्यात एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List