‘एक पद, एक पेन्शन’… हायकोर्टच्या सर्व निवृत्त न्यायमूर्तींना समान, पूर्ण पेन्शन मिळणार

‘एक पद, एक पेन्शन’… हायकोर्टच्या सर्व निवृत्त न्यायमूर्तींना समान, पूर्ण पेन्शन मिळणार

सर्वोच्च न्यायालयाने ‘एक पद, एक पेन्शन’ तत्वाचे समर्थन करीत उच्च न्यायालयांच्या सर्व निवृत्त न्यायमूर्तींना मोठा दिलासा दिला आहे. देशातील उच्च न्यायालयांच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नियुक्तीची तारीख किंवा ते कायमस्वरुपी वा अतिरिक्त न्यायमूर्ती यापैकी काहीही असो, सर्व निवृत्त न्यायमूर्तींना समान आणि पूर्ण पेन्शन द्या, असे आदेश नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने दिले आहेत.

तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायाधीश तसेच सर्व जिल्हा न्यायाधीशांना निवृत्तीनंतरचे फायदे समान देण्यात यावेत, असेही निर्देश सरन्यायाधीशांनी यावेळी दिले. न्यायालयीन स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी व न्यायालयीन कार्यालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी वेतनाप्रमाणेच निवृत्तीनंतरच्या लाभांमध्ये एकसमानता आवश्यक आहे, असे निरिक्षण सरन्यायाधीश गवई यांनी निर्णय देताना नोंदवले.

सर्व उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना त्यांच्या नियुक्तीची तारीख काहीही असो, पूर्ण पेन्शन मिळवण्याचा अधिकार आहे. अतिरिक्त न्यायमूर्ती आणि कायमस्वरुपी न्यायमूर्ती असा न्यायमूर्तींमध्ये कोणताही भेदभाव केला जाऊ नये. विधवा, विधुर आणि इतर अवलंबितांसाठी ग्रॅच्युइटी आणि कुटुंब पेन्शनसारखे फायदे देखील सर्व न्यायमूर्तींसाठी एकसमान असले पाहिजेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायमूर्तींना दरवर्षी 15 लाख रुपये पेन्शन म्हणून मिळतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. भेदभाव करुन उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींना समान पेन्शन देण्यास नकार देणे हे संविधानाच्या अनुच्छेद 14 अंतर्गत समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठाने नोंदवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – अभिषेक शर्माच वादळ पुन्हा एकदा गोंगावलं, हैदराबादने लखनऊला नमवलं; 6 विकेटने केला पराभव IPL 2025 – अभिषेक शर्माच वादळ पुन्हा एकदा गोंगावलं, हैदराबादने लखनऊला नमवलं; 6 विकेटने केला पराभव
प्रथम फलंदाजी करताना लखनऊने दमदार फलंदाजी करत 7 गड्यांच्या मोबदल्यात 205 धावांपर्यंत मजल मारली होती. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादची...
‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3 गंभीर जखमी
India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू सोडल्याची केली मोठी घोषणा
विरोधी पक्षांचा अपमान हा महायुतीचा अजेंडा, सरन्यायाधिशांना तरी त्या चष्म्यातून पाहू नका; अंबादास दानवेंनी फटकारले
एकेकाळी वॉचमन अन् केमिस्ट म्हणून काम करणारा अभिनेता करतोय बॉलिवूडवर राज्य; 160 कोटींचा मालक