Mumbai News – माता न तू वैरिणी… आईसमोरच तिच्या प्रियकराने अडीच वर्षाच्या चिमुरडीच्या शरिराचे तोडले लचके
मालाडमधील मालवणी परिसरात अतिशय संतापजनक आणि माय-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आईसमोरच तिच्या प्रियकराने अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर मुलगी आईसमोरच वेदनेने तडफडत होती. नंतर मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करत आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी महिलेचा घटस्फोट झाला असून सध्या ती माहेरी राहत होती. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर महिलेचे 19 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. रविवारी रात्री महिलेच्या प्रियकराने तिच्या डोळ्यादेखत तिच्या अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. यानंतर वेदनेने तडफडत मुलीचा मृत्यू झाला. यानंतर महिला मुलीला मालवणी येथील जनकल्याण नगर येथे सामान्य रुग्णालयात घेऊन गेली.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत मुलगी अपस्माराने ग्रस्त असल्याचे तिने सांगितले. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी मुलीची तपासून मृत घोषित केले. मात्र मुलीची तपासणी करताना मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळल्या. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मालवणी पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पोस्कोअंतर्गत बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करत आई तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List