भाजपचे तालुका महामंत्री अडकले खनिज चोरीत, सरपंच पदाचा घेत होते गैरफायदा

भाजपचे तालुका महामंत्री अडकले खनिज चोरीत, सरपंच पदाचा घेत होते गैरफायदा

चंद्रपूर जिल्ह्यात घरकुलधारकांना वाळु मिळत नसल्याने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रशासनाच्या विरोधात सूर आळवला होता. परंतु दुसरीकडे मात्र, वाळूची तस्करी करणाऱ्यात भाजपचे नेतेच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. सध्याच्या घडीला चंद्रपुरात खनिज चोरी प्रकरणात भाजपचे तालुका महामंत्री अडकल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हातील हिवरा या गावाचे सरपंच आणि भाजपचे महामंत्री निलेश गिरमा पुलगमकार यांच्या मालकीचे ट्रॅक्टर महसूल विभागाने जप्त केले आहे. गोंडपिपरी तालुक्यात येणारे हिवरा हे गाव राजुरा विधानसभा क्षेत्रात येते. सध्याच्या घडीला या विधानसभा क्षेत्रात खनिजाची चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या विकास कामांना गती आली आहे. ही विकास कामे लोकप्रतिनिधींच्या जवळचे कार्यकर्ते करताहेत. या कामासाठी लागणारे खनिजाची चोरी दिवसरात्र सुरु आहे. गोंडपिपरी तालुक्यातील लिखितवाडा रेती घाटातून नियमबाह्य वाळूचा उपसा सुरू असताना, महसूल विभागाने अद्याप कुठलीच कारवाई केलेली नाही. या वाळू तस्करीत राजुराऱ्यातील भाजप नेत्यांचा नातेवाईकाचा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. असे असताना भाजपचा तालुका महामंत्री मुरूम चोरीत अडकला आहे. महामंत्री आणि हिवरा गावाचे सरपंच असलेले निलेश पुलगमकार स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरने मुरूम चोरी करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. रविवाराला वेडगाव येथील तलाठी विकास चोपडे यांनी घटनास्थळ गाठून मुरमांनी भरलेली ट्रॅक्टर जप्त केली. जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. घडलेल्या घटनेसंदर्भात पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती तलाठी विकास चोपडे यांनी दिली.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खनिजाची चोरी सुरू आहे. यावर भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चिंता सुद्धा व्यक्त केली होती. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे आहेत. त्यांचा क्षेत्रात येणारा गोंडपिपरी तालुका खनिज चोरीचे हब झाले आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे महसूल विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल