अवकाळीने चाळीतला कांदाही सडू लागला, शेतकरी मोठ्या अडचणीत

अवकाळीने चाळीतला कांदाही सडू लागला, शेतकरी मोठ्या अडचणीत

आधीच कांद्याला अत्यल्प दर मिळत असताना या अवकाळी पावसामुळे चाळीत साठवणूक केलेला कांदाही सडू लागला आहे. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे उन्हाळ कांद्याला सध्या 700 ते 1100 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळत आहे. आज ना उद्या दरवाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठवण्यास सुरुवात केली. आधीच लागवडीवेळी झालेल्या पावसामुळे रोपे खराब होऊन दुबार पेरणी करावी लागली होती, त्यासाठी अतिरिक्त मजुरी द्यावी लागल्याने लावणीचा खर्चही वाढला. काढणीच्या वेळीही अवाचे सवा खर्च करून हा कांदा शेतकऱ्यांनी चाळीत साठवला. मात्र, या अवकाळी पावसामुळे अवघ्या दीड महिन्यातच तो सडू लागला. भऊर येथील प्रभाकर पवार यांनी एप्रिल महिन्यात कांद्याची साठवणूक केली. मात्र, या अवकाळी पावसाने चाळीतून पाणी वाहून गेल्याने तो कांदाही खराब झाला. दोन पैसे मिळण्याच्या उद्देशाने साठवलेला कांदा काढून टाकण्याचा खर्चच त्यांना करावा लागला. अशीच स्थिती कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा भागातील बहुतांश कांदा उत्पादकांची झाली आहे.

शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत असूनही शासन मात्र याबाबत गंभीर नाही. कोणत्याच पिकाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक समीकरणे विस्कळीत झाली आहेत. सरकारने कांद्याला योग्य भाव व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुरुंगातील अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडचं सौंदर्य पाहून जेलरचं सुटलं नियंत्रण, बाथरुममध्ये सीसीटीव्ह लावले आणि… तुरुंगातील अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडचं सौंदर्य पाहून जेलरचं सुटलं नियंत्रण, बाथरुममध्ये सीसीटीव्ह लावले आणि…
अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम याची गर्लफ्रेंड म्हणून आजही चर्चेत असणारी अभिनेत्री मोनिका बेदी हिच्या आयुष्यातील असे अनेक किस्से आहे जे...
60 वर्षांच्या आमिर खानचा रोमँटिक अंदाज; कारमध्ये बसताच गर्लफ्रेंडला केलं किस
भूमिकेसाठी ओलांडल्या मर्यादा, दिग्दर्शकाच्या मागणीवर अभिनेत्री हैराण; म्हणाली, खरंच लघवी…
ज्योती मल्होत्रा, नवांकूर चौधरी ते प्रियंका सेनापती; या दहा जणांवर आहे देशद्रोहाचा आरोप
गोल्डन टेम्पल होते पाकड्यांचे लक्ष्य; लष्कराने डाव कसा उधळला याचे दाखवले प्रात्यक्षिक
निरोगी राहण्यासाठी या सवयींचा नक्की अवलंब करा,वाचा सविस्तर
जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त