बॉलिवूड सेलिब्रिटींचे वॉर्डरोब्स पाहिले का; आलिया-करीनाचं लाखोंच्या किंमतीचे शूज अन् बॅग कलेक्श
अनन्या पांडेचं वॉर्डरोब : अनन्या पांडेनं घरात अतिशय सौंदर्यपूर्ण आणि आकर्षक लूक असलेले वॉर्डरोब डिझाइन केलं आहे. यात तिने हँगर्सवर कपडे व्यवस्थित अडकवलेले दिसत आहेत. केवळ कपडेच नाही, तर तिने त्याच खास पद्धतीने तिचे बॅग्स आणि फुटवेअरही ठेवलेले दिसत आहेत. तिने ज्या पद्धतीने तिच्या सर्व वस्तू ठेवल्या आहेत ते फारच आकर्षक वाटत आहे.
प्रियंका चोप्राचं वॉर्डरोब: देसी गर्ल प्रियंका चोप्राने देखील सुपर लग्झरी घरात पांढऱ्या रंगाच्या थीमवर आधारित सुंदर असा वॉर्डरोब तयार केला आहे. या वॉर्डरोबमध्ये प्रियंकाने तिचे फुटवेअर, बॅग्स आणि कपडे अत्यंत व्यवस्थित ठेवले आहेत.
अवनीत कौरचं वॉर्डरोब : अवनीत कौरनेही तिच्या घरात एक वॉक-इन वॉर्डरोब तयार केलं आहे. ही जागा लहान असली तरी तिने तिचा पुरेपूर वापर केला आहे. वर आणि खाली दोन शेल्फवर तिने हँगर्ससह कपडे अडकवले आहेत, तर फुटवेअरसाठी स्वतंत्र सेक्शनही तयार केलं आहे.
गौरी खानचे वॉर्डरोब : शाहरुख खानच्या इंटीरियर डिझायनर पत्नी गौरी खानने आलिशान वॉर्डरोब डिझाइन केलं आहे. पांढरा, सोनेरी आणि काळा रंग यांच्या थीमवर आधारित या वॉर्डरोबच्या प्रत्येक कोपऱ्यातून नक्कीच ती लक्झरी अनुभव दिसत आहे. आलिशान काचेच्या शेल्फवर गौरीने फुटवेअर सजवले आहेत, तर कपड्यांसाठी खास हँगर्स आहेत.
मलायका अरोराचे वॉर्डरोब : मलायका अरोराकडे फुटवेअरचा उत्कृष्ट कलेक्शन दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या या कपाटात मलायकाने साधे पण सुंदर शेल्फ्स बनवले आहेत, ज्यामुळे तिचं कलेक्शन अधिकच आकर्षक दिसत आहे.
करीना कपूरचे वॉर्डरोब : करीना कपूरकडे अतिशय अप्रतिम क्लोजेट आहे. तिने काळ्या रंगाच्या थीमवर आधारित व्हॅनिटी क्लोजेट तयार केले आहे. यात तिने तिचे बॅग्स, फुटवेअर, मेकअप आणि कपड्यांपर्यंत सर्व काही व्यवस्थित ठेवले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List