हैदराबादमध्ये दहशत पसरवण्याचा कट अयशस्वी; ISIS शी संबंधित 2 संशयितांना अटक, स्फोटके जप्त
तेलंगणा पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. हैदराबाद शहरात बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. पोलिसांनी हा डाव उधळून लावला आहे. हैदराबादमध्ये दहशत पसरवण्याचा या दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन संशयित दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. यापैकी विजयनगरम येथील सिराज आणि हैदराबाद येथील समीर यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे हैदराबादमध्ये डमी बॉम्बस्फोटाची योजना आखत होते असा आरोप आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या या संयुक्त कारवाईत इसिसशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी विजयनगरम येथील सिराज आणि हैदराबाद येथील समीर यांना अटक करण्यात आली आहे. हे लोक हैदराबादमध्ये डमी बॉम्बस्फोटाची योजना आखत होते असा आरोप आहे. सिराजने विजयनगरममध्ये स्फोटक साहित्य खरेदी केले. दोघांनाही सौदी अरेबियातील आयसिस मॉड्यूलकडून सूचना मिळाल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List