शेतकऱ्यांच्या सातबारावर आता विमानतळाचे शिक्के; जमीनविक्रीस बंदी, सक्तीचे भूसंपादन!

शेतकऱ्यांच्या सातबारावर आता विमानतळाचे शिक्के; जमीनविक्रीस बंदी, सक्तीचे भूसंपादन!

पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करावयाच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनासाठी संपादित क्षेत्र असा उल्लेख असलेले शिक्के मारण्यास सुरुवात झाली आहे. विमानतळ असलेला विरोध झुगारून सरकारने एक प्रकारे पुढचे पाऊल उचलले आहे. सातबारा उताऱ्यावर शिक्के मारण्याचा निर्णय झाल्यामुळे एक प्रकारे जमीन हस्तांतरणावर देखील बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शेरे मारल्यानंतर हरकती नोंदविण्यास 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच या कालावधीत कोणतीही हरकत न आल्यास तुमचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सातबारा उताऱ्यावर भूसंपादनासाठी इतर हक्कांमध्ये नोंद घालण्यात येऊन या नोंदीचा फेरफार भूसंपादन अधिकाऱ्यांना सादर करावा अशा सूचना संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

विमानतळ प्रकल्प बाधित असलेल्या वनपुरी, उदाचीवादी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांत विमानतळ प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून यासाठी 2832 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे.

बावनकुळे यांच्या आश्वासनाचे काय झाले?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात विमानतळाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना भूसंपादनासाठी प्रस्ताव देण्यात सांगितले होते. तोपर्यंत पुढील पंधरा दिवसांसाठी संपूर्ण कार्यवाही स्थगित करण्यात आली होती. असे असतानादेखील जिल्हा प्रशासनाकडून विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शिक्के मारण्यास सुरुवात झाली असल्याने एक प्रकारे जबरदस्ती आणि एकतर्फी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्या आश्वासनाचे काय झाले हादेखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हा तर बालिशपणा प्रसिद्धीसाठी…’, अमित ठाकरेंच्या पत्रावर गिरीश महाजनांचा खोचक टोला ‘हा तर बालिशपणा प्रसिद्धीसाठी…’, अमित ठाकरेंच्या पत्रावर गिरीश महाजनांचा खोचक टोला
मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष...
मोठी बातमी! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
उर्वशी रौतेलासोबत ‘उप्स मोमेंट’; कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फाटला ड्रेस, त्याच लूकमध्ये रेड कार्पेटवर
शिल्पाला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करत सर्वांना मास्क घालण्याचा दिला सल्ला
“रात्री झोपताना मला बेडवर सैफ अन् या गोष्टी हव्याच” करीना कपूरने सांगितलं बेडरूम सिक्रेट
‘हे’ स्प्रे आहे डासांचा कर्दनकाळ, आता डास पळतील चुटकीसरशी!
भाजपने लोकशाहीतील पक्षपद्धतीचा अपमान केलाय; सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून जयराम रमेश यांची टीका