कामायनी एक्सप्रेसला बॉम्बची धमकी
कामायनी एक्सप्रेसला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. भोपाळ येथील जीआरपी कंट्रोलकडून ही माहिती मिळाली, त्यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली.कामायनी एक्सप्रेस मध्य रेल्वे भुसावळ मंडळातील खंडवा रेल्वे स्थानकात पोहोचली. ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर थांबवली आणि आरपीएफ, जीआरपी, स्थानिक पोलिस, डॉग स्क्वाडसह सर्व संबंधित यंत्रणांनी संपूर्ण रेल्वेची तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान स्थानक परिसर पूर्णत: सील करण्यात आला होता. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. तपासणीदरम्यान आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी तसेच खंडवा स्थानकाचे आयपीएफ यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते. डॉग स्क्वाड आणि पोलिसांनी संपूर्ण ट्रेनची सखोल तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List