“रात्री झोपताना मला बेडवर सैफ अन् या गोष्टी हव्याच” करीना कपूरने सांगितलं बेडरूम सिक्रेट
बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे सैफ अली खान आणि करीना कपूर खान नेहमीच चर्चेत असतात. सैफ आणि करीनाची प्रचंड चाहत आहे, आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायचे असते. त्यामुळे सैफ आणि करीना आपल्या चाहत्यांना सतत काही ना काही, नकळत त्यांच्या सिक्रेटबद्दल माहिती देतच असतात. नुकतेच करीना कपूर खानने तिच्या बेडरूमचे एक खास सीक्रेट उघड केले आहे.
करीना कपूरने सांगितलं तिचं बेडरूम सीक्रेट
सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या लग्नाला जवळपास आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण तरीही त्यांच्यातील केमिस्ट्री आजही तितकीच आकर्षक आहे. चाहत्यांनी या जोडीला ‘सैफीना’ असे नाव दिले आहे. करीना कपूरने डिस्कवरीच्या ‘Star VS Food’ या शोच्या शुटींगदरम्यान सैफ आणि तिच्या बेडरुमचं सीक्रेटचा खुलासा केला आहे.
‘सैफ अन् या दोन गोष्टी मला बेडवर हव्याच’
कुकिंग शो ‘Star VS Food’ च्या शूटिंगदरम्यान करीनाने तिची मैत्रीण तान्या घावरीशी खास गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये करीनाने तिचं हे सिक्रेट सांगितलं आहे. करीनाने सांगितलं की,”रात्री झोपताना मला बेडवर तीन गोष्टी हव्याच असतात. एक म्हणजे वाईनची एक बॉटल, पायजमा आणि माझा नवरा सैफ अली खान.” करीनाचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वजण खळखळून हसायला लागले. इतकेच नाही, तर करीना पुढे म्हणाली, “मला वाटतं, यापेक्षा चांगलं उत्तर असूच शकत नाही. मला यासाठी बक्षीस मिळायला हवं.”
बेबोचं पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण
या शोमध्ये करीना कपूर खानसोबतच तिची मैत्रीण मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करण जोहर आणि प्रतीक गांधी हे देखील दिसणार आहेत. या शोचा प्रोमो व्हिडीओ करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या शोच्या माध्यमातून बेबो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. करीना प्रथमच एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कुकिंग शोमध्ये दिसणार आहे. व्हिडीओमध्ये करीना चीज किसतानाही दिसतं आहे. आणि त्यावेळी ती म्हणतानाही दिसत आहे की, “माझे हात दुखायला लागले आता.” त्याचवेळी करण जोहरचा आवाज ऐकू येतो, “मी माझा चेहरा खराब करू इच्छित नाही.” या शोमध्ये हे सेलिब्रिटी स्वयंपाकघरात आपापल्या खाद्यपदार्थांच्या तयारीदरम्यान संघर्ष करताना दिसणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List