आरोपीने न्यायालयात घातला गोंधळ
शिक्षेसंदर्भात सुनावणी सुरू असताना आरोपीने न्यायालयात गोंधळ घातल्याची घटना वांद्रे न्यायालयात घडली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी इम्रान ऊर्फ दशेरी शेख विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
इम्रानविरोधात काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंद होता. त्याबाबत वांद्रे येथील न्यायालयात सुनावणी सुरू होती. शनिवारी दुपारी इम्रान न्यायालयात आला. न्यायालयात त्याच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी सुरू होती. सुनावणी सुरू असतानाच इम्रानने न्यायालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने न्यायालयातील समोरील काचेवर दोन्ही हात मारून असभ्य वर्तन केले. इम्रानने एका महिला पोलीस शिपाईला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मोबाईल पह्डून टाकण्याची धमकी दिली. तसेच त्याने महिला पोलिसाला धक्काबुकी करून मोबाईल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांना इम्रानला ताब्यात घेतले. तेव्हा तो पुन्हा महिला पोलिसाच्या अंगावर धावून गेला. याप्रकरणी इम्रानविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List