उर्वशी रौतेलासोबत ‘उप्स मोमेंट’; कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फाटला ड्रेस, त्याच लूकमध्ये रेड कार्पेटवर
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या अनोख्या फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्याच दिवशी ‘पॅरट लूक’मुळे आणि त्याच आकाराच्या क्लचमुळेही तिची खिल्ली उडवली गेली होती. आता तिला फाटलेल्या ड्रेसमुळे पुन्हा एकदा ट्रोल केलं जातं आहे.
उर्वशी रौतेलासोबत ‘उप्स मोमेंट’
उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिच्या कान्समधील उपस्थितीने पुन्हा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिचा एक व्हिडिओ क्लिप X आणि अजून एक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,उर्वशीने घातलेल्या काळ्या रंगाच्या ड्रेस फाटला होता आणि ती तशीच रेड कार्पेटवर आली होती. पण कॅमेरामध्ये तिचा हा ‘उप्स मोमेंट’ कैद झाला आहे.
नेटकऱ्यांनी कमेंट्स करत केलं ट्रोल
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आहे. युजरने म्हटलं आहे “कान्समध्ये फाटलेला ड्रेस परिधान करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. ड्रेसचं फिटिंग इतकं खराब आहे की तो फाटला? पण असं वाटतंय की हे मुद्दाम केलं गेलं आहे, जेणेकरून ती पुन्हा हेडलाइन्समध्ये येईल. यापूर्वी तिने उत्तराखंडमध्ये स्वतःचं मंदिर असल्याचं वक्तव्यही केलं होतं.” असं म्हणत तिची खिल्ली उडवण्यात आली.
Urvashi Rautela :- First Indian to have a torn dress at Cannes? pic.twitter.com/ZqePMasB4K
— raman (@Dhuandhaar) May 18, 2025
कान्समधील पॅरट लूकमुळेही बरीच टीका सहन करावी लागली
उर्वशीच्या या लूकवरून सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिच्या स्टाइल सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यापूर्वीही तिच्या कान्समधील पॅरट थीमवर आधारित लूकमुळे तिला बरीच टीका सहन करावी लागली. उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या बिनधास्तपणाने अन् अनोख्या स्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List