वृद्ध महिलांच्या फसवणूक प्रकरणी एकाला अटक
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वृद्ध महिलांची 67 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला दक्षिण सायबर पोलिसांनी अटक केली. मोहित भोजराज असे त्याचे नाव आहे. त्याने सायबर ठगांना बँक खाती उघडून दिली होती. त्या खात्यात फसवणुकीची रक्कम आल्याचे तपासात समोर आले आहे.
तक्रारदार या दक्षिण मुंबईत राहतात. त्याच्या बहिणीने एका खासगी अर्थ पुरवठा करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली होती. त्या कंपनीच्या ग्रुपमध्ये तिला जोडण्यात आले.शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल अशा भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेवून तिने खाते उघडले. त्यात गुंतवणूक केली. गुंतवणूक केलेल्या रकमेवर 1 कोटी 88 रुपयांचा नफा झाला, पण पैसे निघत नव्हते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List