चंद्रपुरातील आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; सहा महिन्यांचा शस्त्र साठा निर्मितीचे आदेश
पहलगाम हल्ल्यानंतर दोन देशातील वाढलेला तणाव लक्षात घेता केंद्र सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. युद्धाची स्थिती निर्माण झालीच तर आयुधांची कमतरता भासू नये, यादृष्टीने देशातील सर्व आयुध निर्माणींना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथेही आयुध निर्माणी असून त्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या आधी मंजूर झाल्या, त्यांनाही कामावर तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भद्रावती आयुध निर्माणीत पिनाका नावाचे मिसाईल, 155 – बोफोर्स सेल, 81 mm marter आणि ग्रेनेडस् निर्मिती केली जाते. पुढील सहा महिने पुरेल एवढा शस्त्रसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भद्रावती आयुध निर्माणी कामाला लागली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List