मस्तच! आता व्हॉट्सअ‍ॅप वेबवरून कॉलिंग

मस्तच! आता व्हॉट्सअ‍ॅप वेबवरून कॉलिंग

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे युजर्संना आता थेट वेबवरून कॉलिंग करण्याची सुविधा मिळणार आहे. याआधी व्हॉट्सअ‍ॅपने वेबवर केवळ चॅटिंग करण्याची सुविधा दिली होती, परंतु आता या नव्या फीचरमुळे युजर्स थेट कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकतील. यासाठी युजर्संना व्हॉटसअ‍ॅपच्या विंडोज किंवा मॅक अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल, परंतु सर्व कॉलिंग फीचर्स व्हॉट्सअ‍ॅप वेबवरसुद्धा उपलब्ध असतील, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या वेब क्लायंटच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये या फीचरची टेस्टिंग सध्या केली जात आहे. येत्या काही आठवड्यांत सर्व युजर्ससाठी ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे फीचर सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. जे युजर्स ऑफिसच्या कामासाठी दररोज ब्राऊझर्सवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, त्यांना आता मोबाईलवरून व्हाईस कॉल किंवा व्हिडीओ कॉल करण्याची गरज नाही. ते थेट लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून कॉल करू शकतील.

नव्या अपडेटनंतर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करता येईल. वेबवर फोन आणि कॅमेरा आयकॉन दिसेल. सध्या व्हाइस अ‍ॅपवर उपलब्ध आहे. हे आयकॉन चॅटच्या नावाजवळ उजव्या बाजूला दिसेल. नव्या बदलानंतर कॉलिंग फिचर सोपे वाटेल. युजर्स आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून थेट व्हाइस कॉल आणि व्हिडीओ कॉल करू शकतील. यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप डाऊनलोड करण्याची गरज नाही. हे फीचर क्रोम, सफारी आणि एज यांसारख्या सर्व प्रमुख ब्राऊझरवर काम करू शकेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल