मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी… ईमेलमध्ये दहशतवाद्याचा उल्लेख

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी… ईमेलमध्ये दहशतवाद्याचा उल्लेख

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये दावा करण्यात आला आहे की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल.

मुंबई विमानतळ आणि ताजमहल पॅलेसला बॉम्बने उडवण्याच्या धमकीच्या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरू झाला आहे. असे सांगितले जात आहे की ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांना “अन्यायाने फाशी दिल्याचा” उल्लेख करत ही धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.
वाचा: कितीही मोठं संकट येऊ द्या, अख्खं जग का बुडेना… शेजारच्या ‘या’ देशाला काहीच पडलं नाही

सुरक्षा यंत्रणा सतर्क

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण मुंबईत लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलवर डॉग स्क्वॉडच्या पथकाने प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली आहे. मुंबई पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाले आहेत. यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.

लष्कराने दहशतवाद्यांचा बदला घेतला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात विशेष खबरदारी घेतली जात आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. मृतांमध्ये अनेकजण महाराष्ट्रातील होते. भारताने या हल्ल्याचा बदला पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून घेतला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते, ज्यामध्ये 100 हून अधिक लोक मारले गेले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आठ दिवस जरी तुरुंगात राहीला तरी तो बॅरिस्टर होऊन बाहेर पडतो…काय म्हणाले संजय राऊत आठ दिवस जरी तुरुंगात राहीला तरी तो बॅरिस्टर होऊन बाहेर पडतो…काय म्हणाले संजय राऊत
महाराष्ट्रात लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोठा हात असलेल्या आणि त्यानंतर ईडीच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या...
दिल्लीत निर्माणाधीन इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू
Photo – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तक प्रकाशन सोहळ्याला खच्चून गर्दी
ट्रम्प सरकारला मूडीजचा धक्का, अमेरिकेची क्रेडिट रेटिंग केली कमी; काय आहे कारण? वाचा…
चापट मारली, नाका-तोंडातून रक्त; चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
विशिष्ट नमुन्यात जात प्रमाणपत्र नसेल तर नोकरभरतीत आरक्षण नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
Mumbai News – मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर