तू सैन्य अधिकाऱ्याची आदर्श पत्नी, तुझे धन्यवाद – ललिता रामदास
लोकांनी मुस्लिम आणि कश्मिरी नागरिकांच्या विरोधात जाऊ नये, असे सांगत या नागरिकांना काही जणांकडून लक्ष्य केले जात असल्यावरून दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नौदलातील लेफ्टनंट विनय नरवाल यांची पत्नी हिमांशीने परखड भूमिका मांडली. याबद्दल धन्यवाद देणारे पत्र देशाच्या पहिल्या नौदलप्रमुखांची लेक ललिता रामदास यांनी हिमांशीला लिहिले आहे. तू सैन्य अधिकाऱयाची आदर्श पत्नी असून तुझे धन्यवाद. तुझा आम्हाला अभिमान वाटतो असे ललिता रामदास यांनी म्हटले आहे. जेव्हा तू माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होती, तुझा तो व्हिडीयो पाहून तुझा अभिमान वाटतो. आजच्या काळात याचीच सर्वाधिक गरज आहे. हिमांशी सैन्य दलातील एका अधिकाऱयाची आदर्श पत्नी आहे, असे ललिता रामदास यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List