Pooja Hegde- का नेसली 70 वर्षांपूर्वीची आजीची जुनी कांजीवरम साडी? वाचा सविस्तर

Pooja Hegde- का नेसली 70 वर्षांपूर्वीची आजीची जुनी कांजीवरम साडी? वाचा सविस्तर

दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या उत्तम अभिनयाने आपली छाप सोडणारी अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या आगामी ‘रेट्रो’ चित्रपटाबद्दल अधिक आशावादी आहे. सध्याच्या घडीला पूजा तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पूजाने 70 वर्षांपूर्वीची कांजीवरम साडी नेसलेली आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना, पूजाने या फोटोला अतिशय मस्त कॅप्शन दिलेली आहे. “कपाटातील ही 70 वर्षांची एक जुनी परंतु सुंदर साडी… ही साडी मला माझ्या सुंदर आजीची आठवण करून देते. माझी आजी संपूर्ण दिवस कांजीवरम साडीमध्ये वावरायची. या अशा साध्या गोष्टींमध्ये सौंदर्य दडलेलं आहे, ‘रेट्रो’.” पूजाने दिलेली ही कॅप्शन सध्या चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

हिरव्या आणि जांभळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या पूजाने केसात गजरा आणि कपाळावर टिकली लावली आहे. पूजाने हातात घातलेल्या हिरव्या बांगड्यामुळे तिचा हा रेट्रो लूक सर्वांनाच भावला आहे.  ‘रेट्रो’ मध्ये पूजा हेगडेसोबत अभिनेता सूर्या मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट निर्मात्यांनी अलीकडेच सोशल मीडियावर प्रेक्षकांसोबत टीझर शेअर केला आणि ‘रेट्रो’ चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले होते.

सोशल मीडियावर सक्रिय असलेली अभिनेत्री पूजा हेगडे या कायम तिच्या घडामोडी शेअर करत असते. पूजाने इंस्टाग्रामवर चित्रपटाचा टीझर शेअर करून महत्त्वाची माहिती दिली होती. पूजा हेगडेने इंस्टाग्रामवर दोन मिनिटांचा टीझर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “या पात्रात माझ्या हृदयाचा एक तुकडा आहे. भावनिक चढ-उतारांनी भरलेल्या ‘रेट्रो’ या प्रेमकथेचा शीर्षक टीझर आला आहे.”

शेअर केलेल्या टीझरमध्ये पूजा हेगडे आणि सूर्या एका तलावाच्या काठावर बसलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री एका गावातील मुलीची भूमिका साकारत आहे. ती सूर्याच्या प्रियकराच्या रूपात त्याच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. यानंतर, सूर्या टीझरमध्ये म्हणतो, “मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवेन, या क्षणापासून मी सर्वकाही मागे सोडेन. मी हसण्याचा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन. माझ्या आयुष्याचा उद्देश फक्त प्रेम आहे, फक्त प्रेम.”

‘रेट्रो’ या वर्षी 1 मे ला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, पूजा हेगडेकडे ‘रेट्रो’ सोबत इतरही अनेक खास प्रोजेक्ट्स आहेत. पूजाकडे ‘थलपथी 69’ आणि ‘है जवानी तो इश्क होना है’ यासह थलपथी विजयसह अनेक मोठे प्रकल्प आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना पाकिस्तानसोबत चर्चा ही फक्त पाकव्याप्त कश्मीर आणि दहशतवादावरच होईल असे सांगितले. तसेच...
जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तात्काळ शस्त्रसंधीसाठी आम्ही मदत केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा
शिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाच्या कारला अपघात, पती-पत्नी ठार तर पाच जण गंभीर जखमी
पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, पाकिस्तानशी चर्चा फक्त POK वरच – पंतप्रधान मोदी
रायपूरमध्ये ट्रक आणि ट्रेलरची धडक, 13 जणांचा मृत्यू; रस्त्यावर पडला रक्त मांसाचा सडा
भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले…