स्मिता पाटीलचा लेक ‘गे’ आहे? बॉलिवूडमध्ये होती चर्चा, अनेकांनी केलं प्रपोज; सत्य काय?
राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा तथा अभिनेता प्रतीक बब्बर त्याच्या कुटुंबीय वादामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या पैलू सांगताना प्रतीकने खुलासा केला की त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बॉलिवूडमधील लोक त्याला ‘गे’ समजत असतं. त्यामुळे त्याला अनेक भयानक अनुभवही आल्याचं त्याने म्हटलं.
स्मिता पाटीलचा लेक ‘गे’ असल्याच्या चर्चा
एका मुलाखतीदरम्यान, त्याने त्याच्या पालकांशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल आणि इंडस्ट्रीमधील त्याच्या संघर्षांबद्दल सांगितले. तो म्हणाला की ,’लोक त्याला समलैंगिक समजत असतं आणि समलैंगिक असणे अजूनही बॉलिवूडमध्ये पटकन स्वीकारलं जात नाही. त्याने असही म्हटलं की तो, प्रत्येकाच्या आवडीचा आदर करतो, पण त्याने हेही स्पष्ट केले की तो समलैंगिक नाही.
लोक ‘गे’ समजून इकडे तिकडे स्पर्श करायचे
तो त्याच्या अनुभवांबद्दल बोलताना म्हणाला, “2017 मध्ये ‘मी टू’ चळवळ सुरू झाल्यापासून इंडस्ट्रीत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी लोक त्याला उघडपणे विविध प्रकारचे प्रस्ताव देत असत. माझ्या 20 व्या वर्षी, मला मुलांकडून खूप अटेंशन मिळायचं. आता ‘मी टू’ आल्याने लोकं थोडं घाबरले आहेत. पूर्वी सगळं उघडपणे व्हायचं, लोक इकडे तिकडे हात लावायचे, त्यामुळे गोष्टी खूप हुशारीने हाताळाव्या लागायच्या. मला वाटतं समलैंगिक मुलांना मीही समलिंगी आहे असं वाटायचं आणि म्हणूनच अनेकांनी मला प्रपोजही केलं आहे”
बॉलिवूडमध्ये अशा चर्चा पसरण्याचं कारण काय होतं?
प्रतीकने त्याच्यासोबत असं होण्याचं कारण सांगितलं ते म्हणजे त्याचाा ‘कोबाल्ट ब्लू’ हा चित्रपट. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या याच चित्रपटामुळे अशा अफवांना खतपाणी मिळालं होतं. या चित्रपटातील त्याची भूमिका पाहून लोकांना तो खऱ्या आयुष्यातही गे आहे असं समजू लागले होते. पुढे तो म्हणाला की हॉलिवूड कलाकार त्यांच्या लैंगिकतेबद्दल खूप उघडपणे बोलतात, परंतु बॉलिवूडमध्ये असे नाही. समलैंगिक असणे अजूनही येथे निषिद्ध आहे. तर अशापद्धतीने त्याने साकारलेल्या एका भूमिकेमुळे लोकांचा असा गैरसमज झाला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List