‘आमिर खान,आता थांबा’; गर्लफ्रेंड गौरीसोबतचा आमिरचा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

‘आमिर खान,आता थांबा’; गर्लफ्रेंड गौरीसोबतचा आमिरचा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चेत असतो. आमिरने अलीकडेच त्याच्या आयुष्यात प्रेम तिसऱ्यांदा आले असल्याची कबुली दिली होती. आमिरने त्याच्या वाढदिवसादिवशी गौरी स्प्राट आणि त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर तो बऱ्याचदी गौरीसोबत दिसला आहे. दरम्यान, आता आमिर खानचा एक नवीन व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये, आमिर गर्लफ्रेंड गौरीसोबत दिसला. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

आमिर खान गर्लफ्रेंडसोबत एक्स पत्नीच्या घराबाहेर स्पॉट

या व्हिडिओमध्ये आमिर खान त्याची एक्स पत्नी रीना दत्ताच्या घराबाहेर गर्लफ्रेंड गौरी स्प्राटसोबत दिसला. विशेष म्हणजे त्यावेळी त्याचा मुलगा जुनैद खानही त्याच्यासोबत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर, इंटरनेटवर अनेक कमेंट्सही दिसत आहेत.युजर्य विविधप्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. काहींनी तर आश्चर्य व्यक्त केलं आहे, तर काहींनी म्हटले आहे की आमिरच्या कुटुंबाला त्याच्या नवीन नात्याबद्दल कोणतीही अडचण कशी काय नाही?

आमिर आणि गौरीसोबत लेक जुनैदही दिसला

एक्स पत्नी रीना दत्ताच्या घराबाहेर आमिर खानला गर्लफ्रेंड गौरीसोबत पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, ‘किती अनोखे कुटुंब आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘आमिर खान, कृपया आता थांबा.’ व्हिडिओचा कमेंट बॉक्स अशाच कमेंट्सनी भरलेला दिसत आहे. दरम्यान यावेळी जुनैदही आमिर आणि गौरीसोबतही दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

आमिरचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण 

आमिर खानने गेल्या महिन्यात त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नात्याची पुष्टी केली होती. त्याने त्याच्या 60 व्या वाढदिवसादिवशी त्याच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. स्वत:च्या वाढदिवसानिमित्त माध्यमांना तिची ओळख करून देताना तो म्हणाला होता ‘तुम्हा सर्वांशी तिची ओळख करून देण्याची ही एक चांगली संधी आहे असे मला वाटले. मग आम्हालाही लपूनही राहावे लागणार नाही. ती बंगळुरूची आहे आणि आम्ही एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखतो. ती मुंबईत होती आणि आम्ही योगायोगाने भेटलो. आम्ही संपर्कात राहिलो आणि आता आम्ही एकत्र आहोत. हे सर्व योगायोगाने स्वतःहून घडले.” असं म्हणत त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.

आमिर गौरी स्प्राटसोबत अनेकदा स्पॉट होतो 

त्यामुळे आता आमिर  गौरी स्प्राटसोबत अनेकदा दिसत आहे. दोघेही पहिल्यांदाच मुंबईत एकत्र दिसले. तसेच आमिर खान गौरीसोबत दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलिकडेच आमिर खानने त्याची प्रेयसी गौरीसोबत शिखर धवनच्या घरीही भेट दिली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पंतप्रधान मोदी हिंमत दाखवा, पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा – कपिल सिब्बल पंतप्रधान मोदी हिंमत दाखवा, पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा – कपिल सिब्बल
पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही हिंमत दाखवा आणि पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, असं राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले आहेत. आज...
निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं
बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक
पाकड्यांच्या कुरापती सुरुच, पंतप्रधानांच्या भाषणानंतर सांबा सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले
IPL 2025 – आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार सामने
पापाने व्यापार बंद करनेकी धमकी देकर वॉर रुकवा दी, संजय राऊत यांचा निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी