23 वर्षीय अविवाहित अभिनेत्री तिसऱ्यांदा आई झाली? चिमुकलीसोबतचा फोटो शेअर करत दिली गोड बातमी
बॉलिवूडपेक्षाही साऊथमध्ये जिची चर्चा होत असलेली अभिनेत्रीच्या घरी एका गोंडस बाळाचे स्वागत करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे ही अभिनेत्री अविवाहित असताना दोन मुलांची आई आहे. त्यात आता तिने तिच्या सोशल मीडियावर एका बाळासोबतचा फोटो पोस्ट केल्याने चर्चांना उधान आलं आहे. ही अभिनेत्री आता तिसऱ्यांदा आई झाली आहे का अशा चर्चा होताना दिसत आहे. नक्की ही अभिनेत्री कोण आहे?
अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचे स्वागत
ही अभिनेत्री म्हणजे दक्षिण अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटातील ‘किसिक’ या प्रसिद्ध गाण्याने चर्चेत आलेली साऊथची अभिनेत्री श्रीलीला. श्रीलीलाने तिच्या घरात एका लहान चिमुकलीचे स्वागत केले आहे. श्रीलीलाने तिच्या आयुष्यात आलेल्या या छोट्या परीचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये चिमुकलीवर प्रेम करताना दिसत आहे
या फोटोंमध्ये श्रीलीला त्या चिमुकलीवर प्रेम करताना दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये, श्रीलीला चिमुकलीच्या गालावर गोड किस करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, श्रीलीला बाळासोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोंसोबत, श्रीलीलाने “घरात आणखी एका नवीन सदस्याची एन्ट्री. हा हृदयावर केलेला थेट कब्जा आहे ” असं कॅप्शनही दिलं आहे.
श्रीलीलाने पुन्हा आई झाली का?
श्रीलीला अविवाहित आहे पण तिने एका अनाथाश्रमातून दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं आहे. लग्नाच्या आधीच ती दोन मुलांची आई झाली आहे. त्यात आता तिची ही इंस्टाग्राम पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.तिच्या या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. पण श्रीलीलाने ही मुलगी तिच्या कुटुंबातील सदस्य आहे की तिने ती मुलगी दत्तक घेतली आहे हे अदयापही स्पष्ट केलेलं नाही.
कार्तिक आर्यनसोबतचा चित्रपट आणि अफेअरच्या चर्चा
2001 मध्ये एमबीबीएस पदवी पूर्ण केल्यानंतर श्रीलीलाने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. ‘किस’ या कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. कामाबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलीला अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटातील ‘किसिक’ या प्रसिद्ध गाण्याने चर्चेत आली. त्यानंतर ती सध्या कार्तिक आर्यनसोबतच्या ‘आशिकी’ फ्रँचायझीच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती कार्तिकसोबत दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List