अभिनेत्रीने तिच्या 16 वर्षांच्या लेकीला दिला ‘ते’ टॉय वापरण्याचा सल्ला; कारण जाणून आश्चर्य वाटेल
बॉलिवूड असो किंवा टेलिव्हिजन सेलिब्रिटी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतातच. आता अशीच एक अभिनेत्री आहे जी अशाच एका विधानामुळे चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीने तिची मुलगी 16 वर्षांची झाल्यावर तिने चक्क तिला सेक्स टॉय किंवा व्हायब्रेटर वापरण्याचा सल्ला दिला. किंवा तिला ते गिफ्ट म्हणून देण्याचा विचार केल्याचं तिने म्हटलं. तिच्या या विधानामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीला आपल्या मुलीला द्यायचे होते सेक्स टॉय
ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे गौतमी कपूर. अभिनेता राम कपूर यांची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री गौतमी कपूर हे मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. तिने अनेक कार्यक्रमांमध्ये तिची प्रतिभा दाखवली आहे. अलिकडेच गौतमी कपूरने मुलांच्या इंटीमेसीबद्दलचा विषय घेत त्यावर अगदी उघडपणे चर्चा केली. तिने सांगितले की जेव्हा तिची मुलगी सिया कपूर 16 वर्षांची झाली तेव्हा तिला तिच्या मुलीला एक सेक्स टॉय द्यायचे होते जेणेकरून ती योग्य निर्णय घेऊ शकेल. मात्र, गौतमी कपूरने यामागील कारणही सांगितले.
अभिनेत्रीने असा निर्णय घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं.
एका मुलाखतीदरम्यान गौतमी कपूरने तिच्या मुलीशी असलेल्या तिच्या मैत्रीपूर्ण नात्याबद्दल बोलाताना सांगितले की, “हे खूप मजेदार आहे की जेव्हा माझी मुलगी 16 वर्षांची झाली तेव्हा मी तिला काय भेटवस्तू द्यायची याचा विचार करत होते आणि मला प्रश्न पडला की मी तिला सेक्स टॉय भेट द्यावी किंवा व्हायब्रेटर. मी माझ्या मुलीला याबद्दल विचारले तेव्हा ती मला म्हणाली आई, तू वेडी झाली आहेस का, तुझं डोकं आहे ना बरोबर? तेव्हा मी तिला विचार करायलाही सांगितलं. आणि तिला मी म्हटलंही की किती माता आपल्या मुलींशी अशा गोष्टींबद्दल बोलण्यास तयार असतील? तू प्रयत्न का करत नाहीस?” असं म्हणत तिने तिच्या मुलीला हे गिफ्ट देण्याचा विचार का केला याबद्दल सांगितलं.
असा विचार करण्यामागचे खरं कारण सांगितलं
तिचे विचार स्पष्ट करत गौतमी म्हणाली, ‘माझ्या आईने माझ्यासोबत जे केले नाही, ते मी माझ्या मुलीसोबतही करू इच्छित नाही. मला असं वाटतं तिने सगळं काही अनुभवायला हवं. अनेक महिला आयुष्याचा आनंद अनुभवल्याशिवायच जगतात. अशा परिस्थितीत का राहायचे? आज माझी मुलगी 19 वर्षांची आहे आणि तिला कमीत कमी मी तरी तसा विचार केला याचे कौतुक वाटतं”. त्यामुळे तिने तिच्या मुलीला हे गिफ्ट देण्याचा विचार केला होता.
दरम्यान वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमुळे राम कपूरही चर्चेत
दरम्यान वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमुळे राम कपूरही चर्चेत आले होते, पण अनेकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली की त्यांनी या परिवर्तनासाठी ओझेम्पिकचा वापर केला का? तेव्हा एका मुलाखतीत गौतमी कपूरने याचाही खुलासा केला, तिची मुलगी सिया, जी स्वतः वजनाच्या समस्येशी झुंजत होती, तिनेच रामला वजन कमी करण्यास प्रेरित केलं असं तिने सांगितले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List