‘इंडियन आयडॉल 12’चा विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात; व्हिडीओ समोर

‘इंडियन आयडॉल 12’चा विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात; व्हिडीओ समोर

‘इंडियन आयडॉल 12’चा विजेता पवनदीप राजन याच्या कारचा सोमवारी पहाटे 3.40 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दुखापतग्रस्त झालेल्या पवनदीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पवनदीप जखमी अवस्थेत दिसत असून डॉक्टर त्याच्यावर उपचार करताना पहायला मिळत आहे. ‘इंस्टंट बॉलिवूड’ने दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबादमध्ये हा अपघात झाला आहे. ‘टीव्ही 9 हिंदी डिजिटल’ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवनदीपवर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. तो पूर्णपणे शुद्धीवर आहे. डॉक्टरांची टीम त्याची देखभाल करत आहे. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो. व्हिडीओत पवनदीपच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वीच 27 एप्रिल रोजी पवनदीपने त्याचा वाढदिवस साजरा केला होता.

पवनदीपने ‘इंडियन आयडॉल’च्या बाराव्या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्याला ट्रॉफी, कार आणि 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं होतं. पवनदीपने अंतिम फेरीत पाच स्पर्धकांना मात दिली होती. अरुणिता कांजीलाल, मोहम्मद दानिश, सायली कांबळे, निहाल तौरो आणि शण्मुखा प्रिया यांना मागे टाकत पवनदीपने विजेतेपद आपल्या नावे केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sufiyan Pasha (@sufiyanpasha114)

कोण आहे पवनदीप राजन?

पवनदीप हा मूळचा उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्याचा असून त्याचे वडील सुरेश राजन, आई सरोज राजन आणि बहीण ज्योतीदीप राजन हे कुमाऊंनी लोककलाकार आहेत. इंडियन आयडॉलचं विजेतेपद जिंकण्याआधी त्याने 2015 मध्ये ‘द व्हॉइस ऑफ इंडिया’ची ट्रॉफी जिंकली होती. या शोमध्ये वेगवेगळ्या गायकांचे टीम होते. त्यापैकी गायक शानच्या टीममध्ये पवनदीप सहभागी होता. त्यावेळी त्याला ट्रॉफीसह 50 लाख रुपयांचं बक्षीस आणि एक कार भेट म्हणून मिळाली होती.

पवनदीपने चंपावतमधील ‘युनिव्हर्सिटी सीनिअर सेकंडरी स्कूल’मधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने उत्तराखंडमधील कुमाऊं विद्यापिठातून पदवीचं शिक्षण घेतलं. पवनदीपने वयाच्या दुसऱ्या वर्षी सर्वांत लहान तबलावादकाचा पुरस्कार मिळवला होता. 2021 मध्ये उत्तराखंड राज्याच्या कला, संस्कृती आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पवनदीपला उत्तराखंडचा कला, पर्यटन आणि संस्कृती ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अभिनेत्रीने तिच्या 16 वर्षांच्या लेकीला दिला ‘ते’ टॉय वापरण्याचा सल्ला; कारण जाणून आश्चर्य वाटेल अभिनेत्रीने तिच्या 16 वर्षांच्या लेकीला दिला ‘ते’ टॉय वापरण्याचा सल्ला; कारण जाणून आश्चर्य वाटेल
बॉलिवूड असो किंवा टेलिव्हिजन सेलिब्रिटी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतातच. आता अशीच एक अभिनेत्री आहे जी अशाच एका विधानामुळे चर्चेत...
‘त्याने माझ्या पँटमध्ये हात घातला…’, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
तुम्ही सुद्धा ‘Sugarfree Diet’ करताय? आरोग्यावर ‘हे’ गंभीर परिणाम दिसून येतील….
हिंदुस्थानी संरक्षण दलाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांनी आभाळातून पैसे आणायचे का? हसन मुश्रीफ संजय शिरसाटांवर भडकले
Jalana: बदनापूर तालुक्याला अवकाळीने झोडपले; गारपीटचा मार, लग्नाचा मंडप हवेने उडाला, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आग, भाविकांमध्ये घबराट