‘मेल्यावर पाणीपण विचारणार नाही….’, अभिनेत्याच्या मृत्यूआधी एक्स-गर्लफ्रेंडचं वक्तव्य, ‘त्याच्या’ मृत्यूनंतर…

‘मेल्यावर पाणीपण विचारणार नाही….’, अभिनेत्याच्या मृत्यूआधी एक्स-गर्लफ्रेंडचं वक्तव्य, ‘त्याच्या’ मृत्यूनंतर…

Celebrity Couples: आपण काही वक्तव्य रागात करतो… आणि काही वर्षांनंतर तिच गोष्ट खरी ठरते… ज्यामुळे प्रचंड वाईट देखील वाटतं. असंच काही प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सिद्धार्ध शुक्ला याच्यासोबत झालं आहे. सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाला 4 वर्ष झाली आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचं निधन झालं. पण सिद्धार्थच्या निधनानंतर देखील अभिनेत्याचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या अभिनेत्याच्या निधनाआधी एक्स-गर्लफ्रेंडने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘मेल्यावर पाणीपण विचारणार नाही….’ असं वक्तव्य भांडणात सिद्धार्थच्या एक्स गर्लफ्रेंडने केलं होतं. सिद्धार्थची एक्स – गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री रश्मी देसाई होती. एक काळ असा होता जेव्हा सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांची गणना टीव्हीवरील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडप्यांमध्ये केली जात होती.

दोघेही कलर्स वाहिनीच्या ‘दिल से दिल तक’ या टीव्ही शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. शोमध्ये अभिनेत्री जास्मिन भसीननेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिद्धार्थ आणि रश्मि यांच्या जोडीला फक्त ऑनस्क्रिन नाही तर, ऑफस्क्रिन देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं.

पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस 13’ शोमध्ये दोघे पुन्हा एकत्र आले. सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांचं प्रेम आणि द्वेषाचे नाते ‘बिग बॉस’मध्ये रंगात आलं.

पण शोमध्ये रश्मी देसाईचा बॉयफ्रेंड अरहान खान शोमध्ये आला तेव्हा वाद आणखी टोकाला पोहोचले. अरहान आल्यामुळे रश्मी आणि सिद्धार्थ यांच्यातील भांडण वाढत गेल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान, शोमध्ये सिद्धार्थ आणि रश्मी यांचे वाद टोकाला पोहोचले.

रश्मीने चहाने भरलेला कप सिद्धार्थच्या अंगावर फेकला. तर सिद्धार्थ देखील रश्मीला फार काही बोलला. ‘तुझ्या सारख्या मुलींच्या मी तोंडी देखील लागत नाही…’ असं सिद्धार्थ म्हणाला होता. तर रश्मी म्हणाली, ‘मला त्याचा खूप तिरस्कार आहे. तो मेला तरी मी पाणी विचारायला जाणार नाही.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम
हिंदी सिनेमात काही जोड्या प्रेक्षकांना खूपच आवडतात. कलाकारांची ही केमिस्ट्री अशी जुळून आलेली असते की अशा जोड्यांचे चित्रपट खूपच प्रसिद्ध...
काही लोक भीती निर्माण करतात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला प्रकाश राज यांचा पाठिंबा
बेडरुममध्ये प्रायव्हसी, मोठी बाग अन् आलिशान बंगला, रिंकू राजगुरूचं घर कसंय माहितीय का?
मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे
चंद्रपूरमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट, दुबार पिकांना फटका
Ratnagiri News – रत्नागिरीत बाल अंतराळवीरांची सायकल सैर, किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन
विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, सुरक्षा भिंतीवर आदळल्याने विमानाला अपघात