भारतातील सर्वात महागडा मराठमोळा टीव्ही अभिनेता; एका दिवसाचे घेतो चक्क 3.50 लाख, 8 वर्षानंतर जोरदार कमबॅक

भारतातील सर्वात महागडा मराठमोळा टीव्ही अभिनेता; एका दिवसाचे घेतो चक्क 3.50 लाख, 8 वर्षानंतर जोरदार कमबॅक

बॉलिवूडमध्ये जसे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आणि अभिनेत्री असतात त्याच प्रमाणे टीव्ही इंडस्ट्रीमध्येही सर्वाधिक मानधन घेणारे सेलिब्रिटीही असतात. जसं की सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही कलाकारांचा विचार केला जातो तेव्हा सर्वात आधी कपिल शर्मा, दिलीप जोशी, रोनित रॉय आणि रूपाली गांगुली यांची नावे लक्षात येतात. तथापि, आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. पण हा अभिनेता भारतातील सर्वात महागडा टीव्ही अभिनेता आहे. एवढच नाही तर हा एक लोकप्रिय मराठी अभिनेता असून तो आठ वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा अभिनेता एका दिवसाचे किंवा एका एपिसोडचे तब्बल 3.50 लाख घेतो.

टीव्हीवरील सर्वात महागडा आणि सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

हा मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर. ज्याचं टॅलेंट हिंदी, मराठी ते साऊथ असं नावारुपाला आलं आहे. त्यात त्याची एक जमेची बाजू म्हणजे त्याचा भारदस्त आवाज. त्याने चित्रपटांमध्ये तर त्याची छाप पाडलीच पण तो आता टीव्हीवरील सर्वात महागडा आणि सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेताही ठरला आहे. त्याने सर्व टीव्ही सुपरस्टार्सना मागे टाकले आहे. तो आता 8 वर्षांनी कमबॅक करत ‘तुम से तुम तक’ या रोमँटिक मालिकेतून टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे.

प्रत्येक एपिसोडसाठी 3.50 लाख रुपये घेतो

शरद केळकर प्रति एपिसोड 3.50 लाख रुपये घेत असल्याची माहिती आहे. त्याच्या येणाऱ्या मालिकेत अनु नावाची मुलगी आणि 46 वर्षीय उद्योगपती आर्यवर्धन यांच्यातील ‘अपारंपरिक प्रेमकथा’ दाखवण्यात आली आहे. सामाजिक निर्णय, वयाची असमानता आणि वर्गभेद यासारख्या विषयांवर आधारित ही मालिकाआहे, ज्यामध्ये केळकर आर्यवर्धनची भूमिका करत आहे तर निहारिका चौकसे अनुची भूमिका साकारत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee TV (@zeetv)


आतापर्यंत अनेक मालिकांमध्येही आपली छाप सोडली आहे

शरदने 2001 मध्ये ‘आप बीती’ या टीव्ही शोमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत शरदने सीआयडी, सिंदूर तेरे नाम का, साथ फेरे – सलोनी का सफर आणि कुछ तो लोग कहेंगे यासह अनेक शो केले आहेत. टीव्हीवर काम करत असताना, शरदने 1920- एविल रिटर्न्स, गोलियों की रासलीला राम-लीला, लै भारी, मोहेंजो-दारो, सरदार गब्बर सिंग, हाऊसफुल 4 आणि तानाजी यासह अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या.

त्याच्या आवाजाची जादू हॉलिवूडपर्यंत 

शरद केळकर आता संपूर्ण भारतातला स्टार बनला आहे. शरदने आपल्या दमदार आवाजाने प्रभासच्या ‘बाहुबली’ ही भूमिका सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवली. या चित्रपटात प्रभासचा हिंदी चित्रपटसाठी आवाज बनलेला शरद केळकरने आपल्या कलेने अनेक हॉलिवूड पात्रांपर्यंत आपलं टॅलेंट पोहोचवलं आहे. तो एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम व्हॉइस आर्टीस्टही आहे. आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज असलेला शरद केळकर आपल्या कलेला एका नवीन पद्धतीने सादर करणार आहे. शरदने अनेक हॉलिवूड चित्रपटांचे डबिंग केले आहे, ज्यात डॉन ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स, गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी, फ्युरियस ७, मॅड मॅक्स: फ्युरी रोड, एक्सएक्सएक्स: रिटर्न ऑफ झेंडर केज आणि हॉब्स अँड शॉ यांचा समावेश आहे.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अभिनेत्रीने तिच्या 16 वर्षांच्या लेकीला दिला ‘ते’ टॉय वापरण्याचा सल्ला; कारण जाणून आश्चर्य वाटेल अभिनेत्रीने तिच्या 16 वर्षांच्या लेकीला दिला ‘ते’ टॉय वापरण्याचा सल्ला; कारण जाणून आश्चर्य वाटेल
बॉलिवूड असो किंवा टेलिव्हिजन सेलिब्रिटी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतातच. आता अशीच एक अभिनेत्री आहे जी अशाच एका विधानामुळे चर्चेत...
‘त्याने माझ्या पँटमध्ये हात घातला…’, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
तुम्ही सुद्धा ‘Sugarfree Diet’ करताय? आरोग्यावर ‘हे’ गंभीर परिणाम दिसून येतील….
हिंदुस्थानी संरक्षण दलाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांनी आभाळातून पैसे आणायचे का? हसन मुश्रीफ संजय शिरसाटांवर भडकले
Jalana: बदनापूर तालुक्याला अवकाळीने झोडपले; गारपीटचा मार, लग्नाचा मंडप हवेने उडाला, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आग, भाविकांमध्ये घबराट