ऐश्वर्या राय की करीना कपूर, कोणाची सासू सर्वात श्रीमंत? दोघींकडे इतके अब्ज, आकडा थक्क करणारा

ऐश्वर्या राय की करीना कपूर, कोणाची सासू सर्वात श्रीमंत? दोघींकडे इतके अब्ज, आकडा थक्क करणारा

Richest mother-in-law: अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री करीना कपूर खान या दोघींना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. करीना हिचा आज देखील बॉलिवूडमध्ये बोलबाला आहे. करीना आणि ऐश्वर्या यांच्याप्रमाणेच त्यांच्या सासूबाई यांनी देखील एकेकाळी मोठ्या पडद्यावर राज्य केलं आहे. आता ऐश्वर्या रायच्या सासू जया बच्चन राजकारणात सक्रिय आहेत. तर करीना कपूरची सासू नवाब कुटुंबातील आहे. त्यामुळे दोन्ही अभिनेत्रींच्या सासूबाईंकडे श्रीमंतीची कमतरता नाही.

ऐश्वर्या रायच्या सासू जया बच्चन यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. तर दुसरीकडे, करिना कपूरची सासू शर्मिला टागोर अजूनही रुपेरी पडद्यावर सक्रिय आहेत. तर आज जाणून घेवू जया बच्चन आणि शर्मिला टागोर यांच्यापैकी कोण जास्त श्रीमंत आहे? कोणाकडे जास्त संपत्ती आणि किती संपत्ती आहे?

जया बच्चन यांची नेटवर्थ…

जया बच्चन पूर्वी प्रमाणे आता सिनेमांमध्ये दिसत नसल्या तरी त्या राजकारणात सक्रिय आहेत. सध्या त्या समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार देखील आहेत. जर आपण त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर त्यांनी निवडणूक आयोगाला संपत्तीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, जया अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 15,78,88,62,397 रुपये म्हणजेच सुमारे 1,579 कोटी रुपये आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, बच्चन दाम्पत्याकडे सुमारे 849 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

त्यांच्या स्थावर मालमत्तेबद्दल सांगायचं झालं तर, त्याची किंमत सुमारे 720 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये शेतीयोग्य जमीन तसेच बिगरशेतीयोग्य जमीन, व्यावसायिक जमीन आणि निवासी जमीन समाविष्ट आहे. शपथपत्रानुसार, जय बच्चन यांच्यावर 105 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे.

शर्मिला टागोर यांची संपत्ती…

गेल्या काही वर्षांत शर्मिला टागोर यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः पती मन्सूर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर. रिपोर्टनुसार, शर्माला यांना त्यांची संपत्ती वारशाने मिळाली आहे. शर्मिला टागोर यांच्याकडे 2.700 कोटी रुपयांची संपत्ती आहे. या प्रचंड संपत्तीमध्ये भारतभर पसरलेले अनेक राजवाडे, वाडे आणि मोठ्या मालमत्तांचा समावेश आहे.

करीना आणि ऐश्वर्या यांची नेटवर्थ…

अभिनेता सैफ अली खानची पत्नी आणि कपूर कुटुंबाची करिना कपूरच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीना कपूर 500 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. सिनेमा, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून करीना कोट्यवधींची कमाई करते.

ऐश्वर्या राय बद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सिनेमांमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, अनेक ब्रँड्सचं प्रमोशन करत असते. ऐश्वर्या राय हिच्याकडे 800 कोटींची संपत्ती आहे… अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रचंड यशानंतरही, पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुन ‘डाउन टू अर्थ’; कारण जाणून तुम्हालाही हेवा वाटेल प्रचंड यशानंतरही, पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुन ‘डाउन टू अर्थ’; कारण जाणून तुम्हालाही हेवा वाटेल
साउथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जून म्हणजे सध्या प्रत्येकाच्या मनात घर केलेला ‘पुष्पा’. पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुनचे प्रत्येक पात्र त्याच्या अ‍ॅटिट्यूडसाठी...
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीला पाहिलंत का? लेटेस्ट लूक पाहून चाहते म्हणाले “ही ऐश्वर्या रायच”
इंडियन आयडल 12 विजेता पवनदीप राजनच्या कारला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू
कॉमेडियन समय रैनासह इतर चौघांना सुप्रीम कोर्टाचे समन्स; दिव्यांग व्यक्तींबाबत असंवेदनशील वक्तव्य भोवणार
बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन, दोन हेडक्वॉर्टरला मंजूरी; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी – केंद्र सरकारने राज्यांना दिले मॉक ड्रिलचे आदेश, नागरिकांना ‘या’ गोष्टींचे दिले जाणार ट्रेनिंग
LIVE : पहलगामच्या बदल्यासाठी सज्ज… दिल्लीत घडामोडींना वेग, NSA अजित डोवाल पंतप्रधानांच्या भेटीला