एक प्रसिद्ध अभिनेत्री… कधीच शाळेत गेली नाही, 225 कोटी कमावले, 18 देशात राहिली
हिंदी सिनेमात अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. या अभिनेत्री उच्च शिक्षित आहेत. तर काही नट्या कमी शिकलेल्या आहेत. पण एक अभिनेत्री अशीही आहे की जिने कधी शाळेचं तोंडच पाहिलं नाही. तरीही तिने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. आज त्याच अभिनेत्री विषयी आपण जाणून घेणार आहोत.
ज्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीने कधीच शाळेचं तोंड पाहिलं नाही तिचं नाव आहे कटरिना कैफ. हे नाव ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. आश्चर्यही वाटेल. भंकस सुरू आहे, असंही वाटेल. पण बातमी खरी आहे. त्याचं असं की, कटरिना लहाणपणापासून वेगवेगळ्या 18 देशात राहिली. त्यामुळे तिचं शालेय शिक्षण झालंच नाही.
कटरिना कैफचा जन्म ब्रिटिश हॉन्गकॉन्गमध्ये 16 जुलै 1983 रोजी झाला. ती अत्यंत लहान असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. तिचं संगोपन तिच्या आईने एकटीने केलं.
कटरिनाची आई सामाजिक कार्यकर्ती आहे. त्यामुळे तिला अनेक देशात जावं लागायचं. आई जिकडे जायची तिकडे कटरिनाही जायची. वेगवेगळ्या देशात जावं लागल्याने तिला शाळेत जाण्याची अशी संधीच मिळाली नाही.
कटरिनाने शाळेत पाऊलही ठेवलं नसलं तरी ती शिक्षित आहे. या भावंडांना शिकवण्यासाठी घरी ट्युटर्स यायचे. त्यामुळेच तिला नॉलेज आहे. अनेक देशात राहिलेली कटरिना आता पूर्णपणे भारतीय झाली आहे. फिल्मी दुनियेत करिअर करण्यासाठी तिने भारताची निवड केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List