Sara Tendulkar आणि Shubhman Gill यांचं ब्रेकअप? एका गोष्टीमुळे मोठं सत्य समोर
Sara Tendulkar and Shubhman Gill: भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडुलकरची लाडकी मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. सारा अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल माीडियावर सारा कायम सक्रिय असते. सारा फक्त तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आता देखील सारा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिल याला सारा डेट करत आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. शिवाय दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोरव धरला. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
इन्स्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना केलं अनफॉलो…
सारा हिने शुभमन गिल याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. फक्त सारा हिनेच नाही तर, शुभमन गिल याने देखील साराला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. इन्स्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर सारा आणि शुभमन यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.
सांगायंचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून सारा आणि शुभमन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी त्यांच्या नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. पण क्रिकेटर हार्दिक पंड्या याने 2020 मध्ये सोशल मीडियावर केलेल्या एका कमेंटमुळे सारा – शुबमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शुबमन गिल याचं नाव अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत जोडलं जात होतं. एवढंच नाहीतर, दोघांचं ब्रेकअप झाल्यामुळे सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चा देखील दिल्या. पण आम्ही कधीही नात्यात नव्हतो असं साराने विनोदवीर कपिल शर्मा याच्या शोमध्ये स्पष्ट केलं होतं. पण दोघांना देखील अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं होतं.
सारा तेंडुलकर – शुबमन गिल
सारा तेंडुलकर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सारा कायम स्वतःचे फोटोशूट आणि व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.. तर शुबमन गिल लोकप्रिय क्रिकेटर आहे. शुबमन कायम त्याच्या उत्तम खेळीमुळे चर्चेत असतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List