काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा
काँग्रेस पक्षाला कोणतेही धोरण नाही. त्यामुळे काँग्रेसला लोक सोडून चालली आहेत. काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा, असा कानमंत्र देत काँग्रेसमधून कोणी आलं तरी तुमचा विचार अगोदर करणार असल्याचे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले. बावनकुळे म्हणाले, पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वच पक्ष पक्षप्रवेश करून घेत असतात. विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही. काँग्रेसला लोकं सोडून चालली आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सगळं दिले तरीदेखील त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांना त्यांच्या पक्षाकडून, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List