जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम
हिंदी सिनेमात काही जोड्या प्रेक्षकांना खूपच आवडतात. कलाकारांची ही केमिस्ट्री अशी जुळून आलेली असते की अशा जोड्यांचे चित्रपट खूपच प्रसिद्ध होतात. सुपरस्टार शाहरुख खान आणि काजोल हे देखील असे स्टार आहेत की ज्यांची केमिस्ट्री खूपच गाजली. एका चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी शाहरुख खान आणि फराह खान यांनी काजोल सोबत अशी मस्करी केली की ज्यामुळे ही अभिनेत्री हैराण झाल होती.
शाहरुख खान आणि अर्धा डझन चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांची जोडी इतकी प्रसिद्ध होती. हे दोघे चित्रपटात असतील तर चित्रपट हीट झाला म्हणूनच समजा. या जोडीची ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'( DDLJ ) हा चित्रपट तुफान चालला होता. यातील एका सीनमध्ये काजोल हीला शाहरुख खान खाली पाडतो आणि ही गोष्ट काजोलला माहिती नव्हती. तिनेच एका मुलाखीत हा किस्सा सांगितला आहे.
काजोलला शाहरुखने मुद्दामहून पाडले
या किस्सा सांगताना स्वत: काजोल हीने सांगितले की ‘रुक जा ओ दिल दिवाने’ या गाण्याच्या वेळचा हा किस्सा आहे.या गाण्याची कोरिओग्राफी करणाऱ्या फराह खान यांनी गाण्याच्या शेवटी शाहरुख काजोलला मुद्दामहून खाली पाडण्यास सांगितले होते. परंतू काजोलला खाली पाडण्यात येणार हे तिच्यापासून लपविण्यात आले होते.
काजोल हीने म्हटले की , ‘फराह खानने शाहरुखला एकट्यात सांगितले होते की तु डान्स करताना काजोलसोबत डान्स करता करता तिला उचल आणि नंतर तिला खाली टाक. परंतू तिला हे सांगू नको, अचानक जेव्हा अशी स्टेप शाहरुख खान याने केली तेव्हा मी हैराण झाले आणि या सीनची खूपच चर्चा झाली आणि माझे एक्सप्रेशन एकदम नॅचरल आहे आहेत असे काजोल हीने सांगितले.
काजोल आणि शाहरुख या चित्रपटात एकत्र
शाहरुख आणि काजोल जेव्हा जेव्हा पडद्यावर एकत्र आले तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना एन्टरटेन्मेटचा फुल डोस मिळाला. या जोडीने ‘दिलवाले दुल्हनिया लें जाएंगे’ तसेच ‘बाजीगर’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘माय नेम इज खान’ आणि ‘दिलवाले’ सारख्या चित्रपटात काम केले. हे चित्रपट तिकीटबारी प्रचंड गाजले, काजोल शाहरुख सोबत साल २०१५ च्या ‘दिलवाले’ चित्रपटात एकत्र दिसले होते.यात वरुण धवन आणि कृती सेनन देखील आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List