मी परवानगी घेऊनच लग्न केलं होतं, सीआरपीएफच्या जवानाने फेटाळले सर्व आरोप

मी परवानगी घेऊनच लग्न केलं होतं, सीआरपीएफच्या जवानाने फेटाळले सर्व आरोप

पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्या प्रकरणी एका सीआरपीएफ जवानाला बडतर्फ करण्यात आले आहे. पण आपण परवानगी घेऊन लग्न केले होते अशी माहिती या जवानाने दिली आहे. तसेच आपल्यावरी सर्व आरोप या जवानाने फेटाळून लावले आहेत.

जम्मू कश्मीरमध्ये राहणारे सीआरपीएफचे जवान मुनीर अहमद यांनी एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केलं होतं. पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याबद्दल त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. मुनीर म्हणाले की, लग्न करण्यापूर्वी मी कार्यालयातून परवानगी घेतली होती. तसेच लग्न करण्याची आपल्याला परवानगी मिळालीही होती. सेवेतून बडतर्फ झाल्याची बातमी माध्यमातून कळाल्याचे मुनीर यांनी सांगितले. तसेच या निर्णयाला आपण कोर्टात आव्हान देणार, आपल्याला न्याय नक्की मिळणार असा विश्वास मुनीर यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;