पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाऊंट हिंदुस्थानात ब्लॉक
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाऊंट हिंदुस्थानात ब्लॉक करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट्सही हिंदुस्थानात ब्लॉक करण्यात आले होते.
इम्रान खान आणि भुत्तो यांच्यासोबतच पाकिस्तानचे माहिती व प्रसारणमंत्री अताउल्लाह तरार यांचेही एक्स अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. तरार यांनी दावा केला होता की इस्लामाबादकडे एक गुप्त माहिती आहे की पहलगाम हल्ल्यानंतर 24 ते 36 तासांच्या आत हिंदुस्थानात पाकिस्तानवर हल्ला करू शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List