पहलगाम हल्ल्यानंतर वाणी कपूरने इन्स्टाग्रामवरून ‘अबीर गुलाल’शी संबंधित सर्व पोस्ट केल्या डिलीट

पहलगाम हल्ल्यानंतर  वाणी कपूरने इन्स्टाग्रामवरून ‘अबीर गुलाल’शी संबंधित सर्व पोस्ट केल्या डिलीट

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदूस्थान -पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, वाणी कपूरने फवाद खानसोबतच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या आहेत.  हिंदुस्थानात या  चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थानात पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करण्यासोबतच फवाद खान आणि वाणी कपूरच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात आली आहे. आता वाणी कपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत. 9मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार होता. पण आता सगळं थांबलं आहे. वाणीच्या सोशल मीडिया व्यतिरिक्त, चित्रपटाशी संबंधित सर्व गाणी आणि प्रमोशनल कंटेंट YouTube इंडियावरून काढून टाकण्यात आले आहे.

हिंदूस्थान सरकारने अनेक प्रमुख पाकिस्तानी कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रवेश रोखल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या हँडलवरून चित्रपटाचे सर्व पोस्ट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदूस्थानात आता प्रतिबंधित असलेल्यांमध्ये फवाद खान, गायक आतिफ असलम आणि उस्ताद राहत फतेह अली खान यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;