Beed crime news – दारुच्या नशेत बापाने बांबू डोक्यात घातला, 21 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरास खेटून असलेल्या खानापूर येथे दारुड्या बापाने मुलाचा खून केल्याची घटना रविवारी घडली. गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपीचे, तर रोहित उर्फ काळू गोपाळ कांबळे (वय – 21) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
माजलगाव शहरात मागील महिन्यात 15 एप्रिल रोजी भाजप कार्यकर्त्याची भर दिवसा कोयत्याने हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यात रविवारी शहरास खेटून असलेल्या खानापूर भागात खुनाची घटना घडली. गोपाळ कांबळे (वय – 50) आणि त्यांचा मुलगा रोहित या दोघांनाही दारूचे व्यसन होते. रविवारी सकाळी दोघेही दारूच्या नशेत घरी आले. दोघांत कुठल्यातरी कारणावरून बाचाबाची झाली व त्यावेळी गोपाळ कांबळे यांनी जवळ असलेला बांबू रोहितच्या डोक्यात मारला. बांबूचा हा घाव वर्मी बसल्याने रोहितचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक आकाश माकणे यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. मयत रोहित याचा मृतदेह पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List