पब्जीमुळे मुलाच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत, दिवसाला 12-12 तास व्हिडीयो गेम खेळायचा!
पब्जी या व्हिडियो गेमच्या अतिरेकामुळे एका किशोरवयीन मुलाला पाठीच्या कण्याचा गंभीर आजार आणि अर्धांगवायू झाला. या मुलावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलाला चालण्यास आणि लघवीला त्रास व्हायचा. वर्षभर हा मुलगा एकांतवासात दिवसाला 12-12 तास गेम खेळत होता.
नवी दिल्लीतील इंडियन स्पाइनल इंज्युरीज सेंटरच्या (आयएसआयसी) निवेदनानुसार या केसमध्ये पब्जी गेम्सच्या अतिरेकामुळे कायफोस्कोलियोटीक स्पाइनल डिफॉर्मिटीमध्ये लक्षणीय वाढ झाली. ही खूप आव्हानात्मक केस होती. यामध्ये मणक्याच्या टीबीची गुंतागुंत आणि गेमिंग व्यसनाचा मानसिक-सामाजिक परिणाम या दोन्हींचा समावेश होता. मणक्यांमध्ये व्यंग होऊन कायमचे अपंगत्व निर्माण होण्याचा धोका होता, असे आयएसआयसीचे स्पाईन सर्विसेसचे प्रमुख डॉ. विकास टंडन म्हणाले.
आम्हाला किशोरवयीन मुलांमध्ये मस्क्युकोस्केलेटल गुंतागुंत होण्याचा त्रासदायक ट्रेंड दिसत आहे. विशेषतः दीर्घकाळ क्रीन एक्सपोजर आणि गेमिंग खेळल्यामुळे हा त्रास वाढत आहे, असे डॉ. टंडन यांनी सांगितले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या मुलाच्या शारीरिक हालचाली मंदावल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List