बेडरुममध्ये प्रायव्हसी, मोठी बाग अन् आलिशान बंगला, रिंकू राजगुरूचं घर कसंय माहितीय का?
Rinku Rajguru : मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. अभिनेत्री, अभिनेते नेमके कुठे राहतात? त्याचं घर कसं आहे? त्यांच्याकडे कोणत्या महागड्या कार आहेत, असे नेहमीच विचारले जाते. विशेष म्हणजे मराठमोळ्या कलाकारांच्या आयुष्याबाबत जाणून घेण्यास तर महाराष्ट्रीयन रसिक नेहमीच आतूर असतो. या कलाकारांच्या यादीत अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचे नाव प्राधान्यक्रमाने येते. दरम्यान, याच रिंकू राजगुरूने एका मुलाखतीत तिच्या घराबाबत माहिती दिली होती.
अगलुजला रिंकू राजगुरूचा मोठा बंगला
रिंकू राजगुरू मूळची अकलुजची आहे. तिथे तिचं चांगलं मोठं घर आहे. याच घराबाबत तिला विचारण्यात आलं होतं. तिने या मुलाखतीत तिच्या अकलुजच्या घरात नेमकं काय काय आहे?याची सविस्तर माहिती दिली होती. “अकलुजला आमचा छान बंगला आहे. मोठं अंगण आहे. बंगल्यामागे बाग आहे. मला मुंबईत घराच्या बाबतीत एक अडचण होती. घरात पाय ठेवताच ते संपल्यासारखे वाटायचे. अकलुजला आमच्या बंगल्यात प्रत्येकाला वेगळी खोली आहे. प्रत्येकाल त्याचा-त्याचा स्पेस आहे,” अशीही माहिती तिने दिली होती.
तसेच, “अकलुजच्या बंगल्यात संध्याकाळी आम्ही अंगणात बसतो. करोना महासाथीच्या काळात आम्ही बंगल्यासमोर बॅडमिंटन, क्रिकेट खेळायचो. गप्पा मारायचो. एकत्र जेवायचो. माझ्या घराच्या आजूबाजूला खूप जाडी आहे. त्यामुळे अकलुजच्या घरी शांततापूर्ण वाटतं. माझ्या घरापासून शाळा ही पंधरा ते वीस मिनिटे दूर होती. मी सायकलवरून शाळेत जायचे,”अशाही जुन्या आठवणी तिने सांगितल्या होत्या.
कोणकोणत्या चित्रपटांत काम
रिंकू राजगुरूने आतापर्यंत सैराट, झिम्मा-2, आठवा रंग प्रेमाचा, खिल्लार, पुन्हा एकदा साडे माडे तीन, पिंगा, आशा अशा अनेक मराठी चित्रपटांत काम केलेलं आहे. 200 हल्ला हो, अनपॉज्ड या हिंदी चित्रपटांत काम केलेलं आहे. तसेच मानसू मल्लिगे या कानडी चित्रपटातही तिने भूमिका केलेली आहे.
कमी काळात रिंकू प्रसिद्धीच्या शिखरावर
दरम्यान, कमी काळात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली रिंकू राजगुरू सैराट या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून सर्वपरिचित झाली. आतापर्यंत तिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांत तसेच वेब मालिकांत काम केलेलं आहे. लवकरच ती तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List